‘फिनिक्स इन्फ्रा’कडून गुंतवणूकदारांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 11:47 PM2018-12-18T23:47:22+5:302018-12-19T00:34:41+5:30

प्लॉट खरेदीच्या नावाखाली गुंतवणूक करण्यास भाग पाडून प्लॉटचा ताबा वा खरेदीखत करून न देता फिनिक्स इन्फ्रा इस्टेट इंटरनॅशनल कंपनीच्या संचालकांनी दोघांची पाच लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे़

 Investigators' fraud by Phoenix Infra | ‘फिनिक्स इन्फ्रा’कडून गुंतवणूकदारांची फसवणूक

‘फिनिक्स इन्फ्रा’कडून गुंतवणूकदारांची फसवणूक

Next

नाशिक : प्लॉट खरेदीच्या नावाखाली गुंतवणूक करण्यास भाग पाडून प्लॉटचा ताबा वा खरेदीखत करून न देता फिनिक्स इन्फ्रा इस्टेट इंटरनॅशनल कंपनीच्या संचालकांनी दोघांची पाच लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे़ या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात पाच संचालकांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़  जुना सायखेडारोड सिद्धेश्वरनगर परिसरातील प्रथमदर्शन हौसिंग सोसायटीतील रहिवासी शिवाजी राजाराम पाटील (५९) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे़ त्यानुसार फिनिक्स कंपनीचे संचालक व कर्मचारी संशयित जितेश नशीने, अहमद ए. जीवानी, विजय गौतम (रा. तिघे नागपूर), मोतीलाल तुकाराम भांडेबुचे (रा. विनोबानगर, जि. भंडारा) व सचिन नाफडे (रा. नाशिक) यांनी गोविंदनगर येथील चंद्रकिरण पार्क येथे फिनिक्स इन्फ्रा इस्टेट इंटरनॅशनल कंपनीचे कार्यालय सुरू केले़ यानंतर अल्पदरात सिन्नर तालुक्यातील देवपूर येथे प्लॉट असल्याचे सांगून शिवाजी पाटील व मीनाक्षी पाटील यांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले़ फिनिक्स कंपनीतील संचालकांच्या आमिषाला बळी पडून पाटील यांनी १ जानेवारी २०१० ते ३१ आॅगस्ट २०११ दरम्यान देवपूर शिवारातील गट नं. ११७०१२, ११७०१३ - १२२६ या भूखंडांवरील प्लॉट नं. ६३१ व ६३२ प्रत्येकी क्षेत्र १५० स्क्वेअर फूट मीटर या प्लॉटसाठी ४ लाख ८३ हजार ४३० रुपयांची गुंतवणूक केली़ संशयित संचालकांनी या प्लॉटचे सेल अ‍ॅग्रीमेंटही करून दिले, मात्र अद्यापही या प्लॉटचा ताबा अथवा खरेदीखत करून दिले नाही़  तसेच याबाबत पाटील यांनी संचालकांशी संपर्क साधला असता त्यांनी टाळाटाळ केली़ अखेर पाटील यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली़

Web Title:  Investigators' fraud by Phoenix Infra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.