नाशकात उद्योजकांकडून होणार पावणेदोन हजार कोटींची गुंतवणूक
By admin | Published: June 1, 2017 02:16 AM2017-06-01T02:16:21+5:302017-06-01T02:16:39+5:30
मुंबई : मुंबईत आयोजित मेक इन नाशिक प्रदर्शनातील दोन दिवसांत नाशिक जिल्ह्यात २८ विविध उद्योगांनी १ हजार ८७५ कोटी रु पयांची गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केली
गोकुळ सोनवणे।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईत आयोजित मेक इन नाशिक प्रदर्शनातील दोन दिवसांत नाशिक जिल्ह्यात २८ विविध उद्योगांनी १ हजार ८७५ कोटी रु पयांची गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केली असून, तसे लेखी पत्र निमाकडे सुपूर्द करण्यात आले आहे. विशेष म्हणजे यातील ९५ टक्के कंपन्या नाशिक जिल्"ातील आहेत. चार पैकी दोन मुंबईतील आहेत. तर एक कंपनी लंडन येथील आहे. या सर्व उद्योगांचा विचार करता जवळपास एक हजार एकर जागा लागण्याची शक्यता आहे.
नाशिकच्या औद्योगिक विकासासाठी निमाच्या वतीने मुंबईत ‘मेक इन नाशिक’ या उपक्रमाचे नेहरू सेंटर येथे दोन दिवस आयोजन करण्यात आले होते. गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकला एकही मोठा उद्योग प्रकल्प आलेला नसल्याने जिल्"ाचे ब्रॅँडिंग करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आल्या. राज्य सरकारने यापूर्वी मुंबईत आयोजित केलेल्या मेक इन इंडिया प्रकल्पात ज्या कंपन्यांनी महाराष्ट्र आणि नाशिकमध्ये गुंतवणुकीत स्वारस्य असल्याचे दर्शविले होते त्यांचे प्रस्ताव राज्य शासनाच्या उद्योग विभागाने निमालाही पाठविले होते. त्याआधारे निमाने पाठपुरावा केल्यानंतर पुन्हा एकदा या कंपन्यांनी स्वारस्य दाखवले होते. तथापि, दोन दिवसांत गुंतवणुकीसाठी इच्छा प्रदर्शित करणारे २८ पैकी २४ उद्योग नाशिकचेच आहेत. नोबेल हाईजिन, डेल्टा स्पीन टेस्ट या दोन कंपन्या मुंबईच्या असून श्रीवेदा सत्व श्रीश्री रविशंकर ही कंपनी बाहेरील आहे. युरोपिअन मेटल सेंट्रल ही कंपनी लंडन येथील आहे. या कंपनीने २७० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा प्रस्ताव एमआयडीसीकडे सादर केला होता. त्याचीही प्रत प्रादेशिक अधिकारी हेमांगी पाटील यांनी निमाला सादर केली. त्यामुळे प्रस्ताव सादर करणाऱ्या उद्योगांपैकी चार उद्योग बाहेरील आहेत.