गुंतवणुकीस बचत खाते गरजेचे : गॅसची सबसिडी आता पोस्टाच्या बचत खात्यात आधार जोडणीसाठी पोस्ट कार्यालय सरसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2017 11:59 PM2017-11-09T23:59:10+5:302017-11-10T00:02:06+5:30

भारत सरकारच्या आदेशानुसार सर्व बचत खातेदारांना आपला आधार क्रमांक व मोबाइल नंबर बचत खात्याशी जोडणे आवश्यक केले आहे. त्यामुळे टपाल विभागातील बचत खाते, आरडी, सुकन्या योजना व आदी सर्व प्रकारच्या खात्यांना खातेदारांचा आधार व मोबाइल क्रमांक जोडण्यासाठी डाक विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी गावोगावी शिबिरे घेण्याचेही नियोजन करण्यात आले आहे.

Investment Savings Account Required: Gas Subsidy Now Post Office For Aadhaar Link In Post Savings Account | गुंतवणुकीस बचत खाते गरजेचे : गॅसची सबसिडी आता पोस्टाच्या बचत खात्यात आधार जोडणीसाठी पोस्ट कार्यालय सरसावले

गुंतवणुकीस बचत खाते गरजेचे : गॅसची सबसिडी आता पोस्टाच्या बचत खात्यात आधार जोडणीसाठी पोस्ट कार्यालय सरसावले

googlenewsNext
ठळक मुद्देआधार व मोबाइल नंबर खात्याशी जोडणे आवश्यक आधार क्रमांक जोडणीची व्यवस्था५० रुपये भरून ग्राहकांना खाते उघडता येणार

सिन्नर : भारत सरकारच्या आदेशानुसार सर्व बचत खातेदारांना आपला आधार क्रमांक व मोबाइल नंबर बचत खात्याशी जोडणे आवश्यक केले आहे. त्यामुळे टपाल विभागातील बचत खाते, आरडी, सुकन्या योजना व आदी सर्व प्रकारच्या खात्यांना खातेदारांचा आधार व मोबाइल क्रमांक जोडण्यासाठी डाक विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी गावोगावी शिबिरे घेण्याचेही नियोजन करण्यात आले आहे.
प्रत्येक ठिकाणी आधार क्रमांक गरजेचा बनत चालला असून, आता डाक विभागातील सर्व बचत खात्यांना आधार क्रमांक जोडण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी शहर व ग्रामीण भागातील प्रत्येक टपाल कार्यालयात ग्राहकांसाठी आधार क्रमांक जोडणीची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती मुख्य प्रवर अधीक्षक पी.जे. कखांडकी, पश्चिम विभागाचे सहाय्यक अधीक्षक प्रफुल्ल वाणी यांनी दिली. खातेदारांनी आपल्या प्रत्येक खात्यासाठी आधार लिंक करून घेण्याचे आवाहन केले आहे. पोस्ट खात्यात मोठ्या प्रमाणात ग्राहकांचे बचत व आरडी खाते आहेत. या सर्वांनी आधार लिंक करणे गरजेचे आहे. त्यासाठी खातेदारांनी जवळच्या टपाल कार्यालयात आधार कार्डची झेरॉक्स देऊन आपल्या खात्याला आधार क्रमांकाची जोडणी करून घेण्याचे आवाहन केले आहे.
केंद्र सरकारच्या अनेक योजनांचे पैसे आता टपाल कार्यालयातील बचत खात्यात जमा होत आहेत. त्यासाठी ग्राहकांना पोस्टात बचत खाते आवश्यक आहे. नवीन बचत खाते उघडण्यासाठी ग्राहकांना टपाल कार्यालयात तीन छायाचित्रे, पॅन, आधार कार्ड सोबत आणावे लागणार आहेत. किमान ५० रुपये भरून ग्राहकांना खाते उघडता येणार आहे. त्याचबरोबर जुन्या ग्राहकांनी बचत व अन्य खाते आधार लिंक करणे गरजेचे बनले आहे. यापूर्वी ग्राहकांना गॅस सबसिडी (अनुदान) जमा होण्यासाठी गॅस एजन्सीला राष्टÑीयीकृत बॅँकेचा बचत खात्याचा क्रमांक द्यावा लागत होता. भारतीय डाक विभागाने गेल्या काही वर्षांपासून कात टाकली असून, बचत खाते आॅनलाइन झाले आहे. त्यामुळे गॅस सिलिंडरचे अनुदान जमा करण्यासाठी पोस्ट विभागाच्या बचत खात्याच्या क्रमांक दिला तरी आता गॅस सिलिंडरचे अनुदान ग्राहकांच्या पोस्टातील बचत खात्यावर जमा होत आहे. पोस्ट खात्याच्या बचत खात्यावर गॅसचे अनुदान जमा होणारे येथील नीलेश कुलथे हे पहिले ग्राहक ठरले. त्यांच्या पोस्ट खात्याच्या बचत खात्यावर गॅसचे अनुदान जमा झाल्याबद्दल येथील प्रभारी पोस्ट मास्तर अमोल गवांदे यांच्या हस्ते त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.

Web Title: Investment Savings Account Required: Gas Subsidy Now Post Office For Aadhaar Link In Post Savings Account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.