संथगती कामामुळे अपघातांना आमंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 02:06 PM2018-03-14T14:06:16+5:302018-03-14T14:06:16+5:30
पेठ - महाराष्ट्र व गुजरात या दोन राज्यांना जोडणारा नाशिक- पेठ- पार्डी या राष्ट्रीय महामार्ग क्र मांक ८४८ चे रु ंदीकरणाचे काम अतिशय संतगतीने सुरू असल्याने या मार्गावरील वाहनधारकांना समस्यांचा सामना करावा लागत असून अपघातांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.
पेठ - महाराष्ट्र व गुजरात या दोन राज्यांना जोडणारा नाशिक- पेठ- पार्डी या राष्ट्रीय महामार्ग क्र मांक ८४८ चे रु ंदीकरणाचे काम अतिशय संतगतीने सुरू असल्याने या मार्गावरील वाहनधारकांना समस्यांचा सामना करावा लागत असून अपघातांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या दुसºया टप्प्यातील काँक्र ीटीकरणाचे काम सद्या सुरू असून पुर्वीचा रस्ता काढून नव्याने कॉक्र ीट टाकण्याचे काम अतिशय संतगतीने सुरू आहे. त्यातही वाहतूकीसाठी कोणत्याही प्रकारची पर्यायी व्यवस्था केली जात नसल्याने वाहनधारकांना दगड गोटे व धुळीचा सामना करत प्रवास करावा लागत आहे. यामुळे अनेक अवजड वाहनांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. नाशिक- पेठ- गुजरात या मार्गावरून मोठ्या प्रमाणावर अवजड वाहतूक केली जात असून खराब रस्त्यामुळे वाहतूकीची कोंडी घेऊन तासन्तास अडकून पडण्याचे प्रकार घडत आहेत. त्यातही लहान वाहने व दुचाकीस्वारांना तर कसरत करत जीव धोक्यात घालुन प्रवास करावा लागत असल्याने किमान काम पुर्ण होईपर्यंत पर्यायी व्यवस्था तरी सुरळीत करावी अशी मागणी परिसरातील जनतेकडून करण्यात येत आहे. नाशिक - पेठ रस्त्यावरील करंजाळी हे मुख्य बाजारपेठेचे गाव या गावात मोठ्या प्रमाणावर अतिक्र मण झाल्याने शिवाय रस्त्यावरच खाजगी प्रवासी वाहतूक करणार्या वाहनांचा गराडा असल्याने वाहतूक कोंडी नित्याचीच झाली होती. शुक्र वारी आठवडे बाजाराच्या दिवशी तर व्यापार्यांनी रस्त्यावर दुकाने थाटून वाहतूकीच्या कोंडीत भर टाकत . मात्र राष्ट्रीय महामार्गाच्या रूंदीकरणात संपूर्ण अतिक्र मणे जमीनदोस्त केल्याने करंजाळी बसस्टँड परिसराने मोकळा श्वास घेतला असून रस्त्याच्या कामानंतर ही अतिक्र मणे जैसे थे होऊ नयेत अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.