मेक इन नाशिकसाठी निमंत्रण
By admin | Published: April 6, 2017 02:00 AM2017-04-06T02:00:23+5:302017-04-06T02:00:36+5:30
सातपूर : मुंबईत आयोजित मेक इन नाशिक उपक्रमाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमाच्या वतीने निमंत्रण देण्यात आले
सातपूर : मुंबईत आयोजित मेक इन नाशिक उपक्रमाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमाच्या वतीने निमंत्रण देण्यात आले असून, या उपक्र मासाठी योग्य ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
नाशिकच्या औद्योगिक विकासासाठी मुंबईत ‘मेक इन नाशिक’ या उपक्र माचे नेहरू सेंटर येथे ३० व ३१ मे रोजी आयोजन करण्यात आले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या उपक्र माचे उद्घाटन करण्यात येणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून उद्योगमंत्री सुभाष देसाई उपस्थित राहणार असल्याची माहिती निमाचे अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी यांनी दिली. निमाचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गोपाळे, सरचिटणीस उदय खरोटे, अनिल बाविस्कर आदिंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेऊन उद्घाटनासाठी आमंत्रित केले आहे. गेल्या पंधरा ते वर्षांपासून नाशिकला एकही मोठा उद्योग प्रकल्प आलेला नसल्याने नाशिकचा औद्योगिक विकास खुंटला आहे. विदर्भ मराठवाड्याला वीजदरात सवलत दिल्याने नाशिकच्या उद्योजकांवर अन्याय झाला आहे. म्हणून नाशिकला मोठा उद्योग प्रकल्प मिळावा, विमानतळाचा प्रश्न मार्गी लावावा, दिंडोरीला दोन वर्षांपासून चारशे हेक्टर जागा संपादित केली असली तरी अद्याप प्लॉटिंग झालेले नाही, अशा अनेक समस्या आहेत. यावर उपाययोजना करण्यासाठी निमा, एमआयडीसी, जिल्हा उद्योग केंद्र आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या बैठकीत मुंबईला मेक इन नाशिक हा उपक्र म राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उपक्र मांतर्गत मुंबईतील मोठ्या उद्योगांशी, मर्चंट्स एक्स्पोर्ट्स, विविध देशांचे दूतावास यांच्याशी संवाद साधून नाशिकच्या विकासाचा टप्पा गाठण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या उपक्र माला जिल्हा प्रशासनाचे शासकीय स्तरावर सर्व सहकार्य लाभणार आहे. (वार्ताहर)