उज्जैन कुंभमेळ्याचे साधू-महंतांना निमंत्रण
By admin | Published: September 20, 2015 11:31 PM2015-09-20T23:31:38+5:302015-09-20T23:32:23+5:30
उज्जैन कुंभमेळ्याचे साधू-महंतांना निमंत्रण
त्र्यंबकेश्वर : मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिली भेटत्र्यंबकेश्वर : एप्रिल २०१६ मध्ये उज्जैन येथे भरणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याचे निमंत्रण मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी त्र्यंबकेश्वर येथे असलेल्या दहाही आखाड्यांना सपत्नीक जाऊन दिले.
श्री निरंजनी पंचायती निरंजनी आखाडा येथे चौहान यांनी आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्रगिरी महाराज यांना निमंत्रण दिले. यावेळी निरंजनी आखाड्याचे श्री महंत तथा सचिव रामानंद पुरीजी, श्री महंत आशिश गिरीजी, श्री महंत रवींद्रपुरीजी आदिंसह साधू-महंत उपस्थित होते. जिल्हाधिकारी दीपेन्द्रसिंंह कुशवाह, मेळा अधिकारी महेश पाटील, प्रातांधिकारी बाळासाहेब वाकचौरे तसेच पोलीस उपविभागीय अधिकारी प्रवीण मुंडे (आय पी एस) आदि अधिकारी
उपस्थित होते.
त्र्यंबकमधील श्रीनिरंजनी पंचायती आखाडा, श्री महानिर्वाण आखाडा, श्री पंचायती उदासीन बडा आखाडा, श्री पंचायती उदासीन तथा आखाडा, श्री अटल आखाडा, श्री निर्मल आखाडा, श्री अग्नी आखाडा, श्री आवाहन आखाडा, श्री शंभू पंच जुना आखाडा व श्री पंचायती आनंद आखाडा या दहा आखाड्यांसह त्र्यंबकेश्वरला सध्या असलेल्या आचार्य महामंडलेश्वर, श्रीगुरु कार्ष्णि, विश्वात्मानंद गिरीजी आदिंनाही मुख्यमंत्र्यांनी निमंत्रण दिले. या दौऱ्यात त्र्यंबकेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले. कुशावर्त तीर्थावरही चौहान यांनी दर्शन-पूजन केले. (वार्ताहर)