कोरोना काळातील स्थलांतरितांना मतदानासाठी आमंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 00:31 IST2021-01-15T00:29:41+5:302021-01-15T00:31:17+5:30
दिंडोरी : कोरोनाच्या काळात मुंबई सह परगावी असलेल्या ग्रामस्थांनी गावी येऊ नये असे वाटणाऱ्या गावकऱ्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मुंबईकरांना सन्मानाने गावी येण्याचे आमंत्रण दिले असून हजारो मतदार मुंबईहुन गावाकडे रवाना झाले आहेत.

कोरोना काळातील स्थलांतरितांना मतदानासाठी आमंत्रण
दिंडोरी : कोरोनाच्या काळात मुंबई सह परगावी असलेल्या ग्रामस्थांनी गावी येऊ नये असे वाटणाऱ्या गावकऱ्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मुंबईकरांना सन्मानाने गावी येण्याचे आमंत्रण दिले असून हजारो मतदार मुंबईहुन गावाकडे रवाना झाले आहेत.
दरम्यान लोकल गोदावरी एक्स्प्रेस, शटल रेल्वेसेवा व रेल्वेत जनरल बोगीत बसण्याची सुविधा नसल्याने टॅक्सी रिक्षाने मतदार गावी परतले आहे. धुळे, जळगाव, नंदुरबार, मालेगाव, सटाणा परिसरातील विविध ग्रामपंचायतीचे स्थलांतरित मतदार मिळेल त्या वाहनाने गावी परतत अशले जात असून त्याकरीता रिक्षाचे प्रमाण लक्षणीय होते.
पिंपळगाव बसवंत येथील सीएनजी पंपावर रिक्षा, टॅक्सीत सीएनजी भरण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. यातील बहुतांशी मतदार गावातून फोन आल्याने मतदानासाठी गावी जात होते. कोरोना काळात आम्हाला गावी येऊ नये असे वाटणारे ग्रामस्थ आता मतदानासाठी आम्हाला येण्याचे साकडे घालत असून आम्हीही मतदानासाठी जात असल्याचे या मतदारांनी सांगितले. (१४ दिंडोरी)