राज्यस्तरीय विचार गटात उर्दू शिक्षकांना सहभाग करून घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:14 AM2021-03-08T04:14:33+5:302021-03-08T04:14:33+5:30

मालेगाव : राज्यातील शिक्षण क्षेत्राचा सर्वांगिण विकास करताना मार्गदर्शन तथा मदत व्हावी, यासाठी राज्यातील शिक्षण क्षेत्रातील विविध नामवंत, उपक्रमशील ...

Involve Urdu teachers in state level thinking groups | राज्यस्तरीय विचार गटात उर्दू शिक्षकांना सहभाग करून घ्या

राज्यस्तरीय विचार गटात उर्दू शिक्षकांना सहभाग करून घ्या

Next

मालेगाव : राज्यातील शिक्षण क्षेत्राचा सर्वांगिण विकास करताना मार्गदर्शन तथा मदत व्हावी, यासाठी राज्यातील शिक्षण क्षेत्रातील विविध नामवंत, उपक्रमशील शिक्षक व अधिकाऱ्यांचा विचार गट स्थापन करण्यात आला आहे. यात उर्दू माध्यमातील शिक्षकांनाही सहभागी करून घेण्यात यावे, अशी मागणी अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघातर्फे करण्यात आली आहे.

याबाबत शालेय शिक्षण विभागाच्या उपसचिव राजेंद्र पवार यांनी ५ मार्च २०२१ रोजी शासन निर्णय जारी केला. विचार गटात उर्दू माध्यमातील एकाही शिक्षकांचे नाव टाकण्यात आलेले नाही. त्यामुळे उर्दू शिक्षकांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाचे राज्य सरचिटणीस साजिद निसार अहमद यांनी राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, शिक्षण सचिव वंदना कृष्णा, शिक्षण आयुक्त विशाल सोलंकी, संचालक दिनकर टेमकर यांच्याकडे राज्यस्तरीय विचार गटात उर्दू माध्यम शिक्षकांना सहभागी करुन घेण्यात यावे, अशी मागणी पत्राद्वारे केली आहे.

इन्फो...

विचार गटात अधिकारी व शिक्षक

विशाल सोळंकी, शिक्षण आयुक्‍त (विचार गटाचे अध्यक्ष), दिनकर टेमकर, संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण (उपाध्यक्ष), विकास गरड, प्र-प्राचार्य, आयटी (सहसचिव), उल्हास नरड, चंद्रपूरचे माध्यमिक शिक्षणाधिकारी, कादर शेख, सोलापूर महापालिका प्रशासन अधिकारी, एकनाथ आंबोकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सिंधुदुर्ग, डॉ. वैशाली वीर, नाशिकचे प्राथमिक शिक्षणाधिकारी, कमलाकांत म्हेत्रे, पंचायत समिती, पुणे, गटशिक्षणाधिकारी, कलीमोद्दिन शेख, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, औरंगाबाद, योगेश सोनवणे, ज्येष्ठ अधिव्याख्याता, जिल्हा व प्रशिक्षण संस्था, नाशिक, रणजितसिंह डिसले, जिल्हा परिषद शाळा, कदमवस्ती, परितेवाडी, बालाजी जाधव, जिल्हा परिषद शाळा, विजयनगर, सातारा, संदीप गुंड, जिल्हा परिषद शाळा, पालघर, सुनील आलुरकर, जिल्हा परिषद शाळा, मुंगशी, नांदेड, आनंदा आनेमवाड, जिल्हा परिषद शाळा, कल्याण मराठी डहाणू, पालघर, मृणाल गांजळे, जिल्हा परिषद शाळा, पिंपळगाव, म्हाळुंगे, पुणे, शहाजी भापकर, जिल्हा परिषद शाळा, सरदवाडी, जामखेड, दत्तात्रय वारे ,जिल्हा परिषद शाळा वाबळेवाडी, शिरूर, अर्जुन कोळी, कऱ्हाड नगर परिषद शाळा क्रमांक तीन, कऱ्हाड, दीपाली सावंत, जिल्हा परिषद शाळा, कोल्ही, वर्धा, भाऊसाहेब चासकर, जिल्हा परिषद शाळा, वीरगाव, ता. अकोले, राजेंद्र परतेकी, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, पालडोह, चंद्रपूर, अंकुश गावंडे, जिल्हा परिषद शाळा, मंगरूळ चवाळा, अमरावती, भगवंत पाटील, पै. शंकर तोडकर हायस्कूल, वाकरे, कोल्हापूर, दत्तात्रय गुंजकर, जिल्हा परिषद शाळा, पुयना, हिंगोली, नितीन पांचाळ, जिल्हा परिषद शाळा, पाचल बौध्दवाडी, राजापूर, रत्नागिरी, बापू बाविस्कर, जिल्हा परिषद शाळा, दत्तावाडी, औरंगाबाद, गजानन जाधव, रा. जिल्हा परिषद शाळा, चिंचवली, रायगड, अमरसिंग मगर, बृहन्मुंबई मनपा माध्यमिक शाळा, बर्वे नगर, मुंबई आणि ज्योती बेलवले जिल्हा परिषद शाळा, दोऱ्याचा पाडा, ठाणे यांची सदस्य म्हणून नियुक्‍ती करण्यात आली आहे.

इन्फो...

विद्यार्थ्यांसह शाळांचा सर्वांगिण विकास करुन जागतिक स्तरावर गुणवत्तेत विद्यार्थी टिकावेत यासाठी राज्य सरकारने नव्याने विचार गट स्थापन केला आहे. त्याचे अध्यक्ष शिक्षण आयुक्‍त असून, उपाध्यक्ष म्हणून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षणचे संचालक आहेत. या विचार गटात तीस जणांची समिती आहे. ही समिती आता प्रत्येक जिल्ह्यामधील जिल्हा परिषदेच्या शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी काम करणार आहे.

Web Title: Involve Urdu teachers in state level thinking groups

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.