लसीकरणात पुढाऱ्यांची लुडबूड, डॉक्टर, कर्मचाऱ्यांवर दबाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:18 AM2021-09-15T04:18:56+5:302021-09-15T04:18:56+5:30

इन्फो... डोस मुबलक मिळतात पण.. - महपालिकेच्या निवडणुका तोंडावर असल्याने आता प्रभागातील वेगवेगळ्या भागात लसीकरण केंद्रे सुरू आहेत. - ...

Involvement of leaders in vaccination, pressure on doctors, staff | लसीकरणात पुढाऱ्यांची लुडबूड, डॉक्टर, कर्मचाऱ्यांवर दबाव

लसीकरणात पुढाऱ्यांची लुडबूड, डॉक्टर, कर्मचाऱ्यांवर दबाव

Next

इन्फो...

डोस मुबलक मिळतात पण..

- महपालिकेच्या निवडणुका तोंडावर असल्याने आता प्रभागातील वेगवेगळ्या भागात लसीकरण केंद्रे सुरू आहेत.

- सध्या महापालिकेला मुबलक डोस मिळत असल्याने वादाचे प्रसंग कमी झाले आहेत. मात्र, ज्यांना नगरसेवकांनी टोकन वाटले आहेत त्यांनाच लस द्या यासाठी दबाव आणला जातो.

- ऑनलाईन बुकिंग तसेच अन्य प्रभागातील नागरिकांना नंतर लस द्या आधी आपल्या भागातील मतदारांना लस देण्यासाठी दबाव असतो.

इन्फो...

ही घ्या उदाहरणे

१ सिडकोत एका प्रभागात एका नगरसेविकेपेक्षा तीच्या आडदांड पतीचाच सर्वत्र जोर असतो. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून नेांदणीची कागदपत्रे ताब्यात घेऊन स्वत:च नोंदणी करण्यास या नगरसेविकेच्या पतीने सुरूवात केली. शेवटी आयुक्तांना हस्तक्षेप करावा लागला.

२ पंचवटीतील मायको रुग्णालयात देखील राजकीय नेत्यांनी गोंधळ घातला. आपण टोकन दिलेल्या नागरिकांचे आधी लसीकरण करा तसेच बाहेरील नागरिकांना लस देऊ नका या आग्रहामुळे वाद झाला.

३ दसक येथील लसीकरण केंद्रावर देखील नागरिक लसीकरणासाठी रांगेत उभे असताना दुसरीकडे मात्र वशिल्याने नागरिकांना लस देण्यासाठी कार्यकर्ते नेत असल्याने वाद झाले शेवटी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.

कोट...

लसीकरण केंद्रांवर बऱ्याचदा नागरिक रांगेने उभे असतात, त्यात जरा मागे पुढे झाल्यास नागरिकांत वादंग हेात असले तरी त्या पलिकडे फार मोठ्या वादाच्या घटना घडलेल्या नाहीत.

- डॉ. आवेश पलोड, कोरोना सेल प्रमुख, मनपा

Web Title: Involvement of leaders in vaccination, pressure on doctors, staff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.