आयपीसीसीत नाशिकमधून पूजा जगवानी प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 12:37 AM2018-01-29T00:37:22+5:302018-01-29T00:38:37+5:30
इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाउंटंट आॅफ इंडियातर्फे घेण्यात आलेल्या इंटरमिडीएट अर्थात आयपीसीसी परीक्षेचा निकाल बुधवारी (दि. २८) जाहीर झाला असून, या परीक्षेत नाशिकची पूजा दिलीप जगवानी हिने जिल्ह्यात प्रथम, तर देशात १६वा क्रमांक मिळवला आहे. तर दुसºया क्रमांकावर हर्ष लोढा याने यश संपादन केले असून, तो देशात दुसरा आला आहे.
नाशिक : इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाउंटंट आॅफ इंडियातर्फे घेण्यात आलेल्या इंटरमिडीएट अर्थात आयपीसीसी परीक्षेचा निकाल बुधवारी (दि. २८) जाहीर झाला असून, या परीक्षेत नाशिकची पूजा दिलीप जगवानी हिने जिल्ह्यात प्रथम, तर देशात १६वा क्रमांक मिळवला आहे. तर दुसºया क्रमांकावर हर्ष लोढा याने यश संपादन केले असून, तो देशात दुसरा आला आहे. सनदी लेखापाल (सीए) होण्यासाठी आवश्यक असलेली आयपीसीसी ही परीक्षा नोव्हेंबर २०१७ मध्ये घेण्यात आली होती. या परीक्षेच्या पहिल्या ग्रुपसाठी ७२ हजार १४८ परीक्षार्थी प्रविष्ट झाले होते. त्यात दहा हजार ४२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, दुसºया ग्रुपसाठी ६५ हजार ३९३ परीक्षार्थी प्रविष्ट झाले होते. दोन्ही ग्रुपमध्ये १३ हजार १४९ परीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात नाशिक जिल्ह्यातून पूजा दिलीप जगवानी हिने प्रथम क्र मांक पटकावला. तिला दोन्ही ग्रुपमध्ये एकूण ४९८ गुण मिळाले. अकाउंट विषयात सर्वाधिक ९४ गुण मिळाले आहे. तथापि, एका खासगी कंपनीकडून मिळालेल्या शिष्यवृत्तीच्या आधारे सीए होण्याचे स्वप्न बघणाºया पूजाने सीए होण्याची आणखी एक पायरी यशस्वीरीत्या पार केली आहे.