'आयपीएल' सट्टेबाजी : महाविद्यालय परिसरात अड्ड्यावर पोलीसांचा छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 02:40 PM2019-04-10T14:40:59+5:302019-04-10T14:41:46+5:30
क्रिकेट विश्वाचे लक्ष असलेल्या इंडियन प्रिमिअर लिग (आयपीएल) स्पर्धा रंगली आहे. याचा लाभ उठवत विविध शहरांमध्ये सट्टेबाज सक्रीय झाले असून यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी अडकत असल्याचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या निदर्शनास आले.
नाशिक : सध्या सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेवरील विविध सामन्यांवर सट्टेबाजी सुरू असल्याची माहिती नाशिक शहर पोलिसांना मिळाली. त्यानुसार आडगाव पोलीस ठाणे हद्दती गुन्हे शोध पथकाने एका महाविद्यालयाच्या परिसरात सरस्वतीनगर भागात सट्टा खेळला जात असलेल्या अड्डयावर छापा मारला. तीघा संशयितांसह पोलिसांनी ६५ हजार ७०० रूपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.
क्रिकेट विश्वाचे लक्ष असलेल्या इंडियन प्रिमिअर लिग (आयपीएल) स्पर्धा रंगली आहे. याचा लाभ उठवत विविध शहरांमध्ये सट्टेबाज सक्रीय झाले असून यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी अडकत असल्याचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी शहरात सर्व गुन्हे शाखा व पोलीस ठाण्यांना सतर्कतेचे आदेश देत सट्टेबाजांचे अड्डे उद्ध्वस्त करण्याच्या सुचना दिल्या. त्यानुसार आडगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकातील कर्मचारी मुनिर काझी, विजय सुर्यवंशी, विनोद लखन यांना मुंबई-्रआग्रा महामार्गावरील एका महाविद्यालयाच्या समोर सरस्वतीनगरमध्ये क्रि केट सामन्यावर सट्टा सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मंगळवारी (दि.९) रात्री दहा वाजेच्या सुमारास छापा टाकला. यावेळी संशयित श्रेयश सुधाकर ढोले (२१), केतन कैलास आहेर (२१, रा. दोघे लक्ष्मीछाया अपार्टमेंट, सरस्वतीनगर ) व तेजस आण्णासाहेब गंगावणे (१९, रा. हरीदर्शन अपार्टमेंट, धात्रक फाटा ) हे टीव्हीवर क्रिकेट सामना बघत सट्टा खेळताना आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांचा मुख्य सुत्रधार सट्टेबाज अमोल ठुबे हा असून तो अहमदनगर जिल्ह्यातील खेडगाव येथील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्याच्या मागावर पोलीसांचे एक पथक रवाना झाले आहे. संशियत तरूण क्रि केटचा सामना बघत ३मोबाईलच्या माध्यमातून 3 जवळील एका वहीमध्ये क्रि केटच्या नोंदी करत असल्याचे पोलिसांना आढळले. त्यांच्याकडील 2 हजार 200 रूपयांची रोकड, टिव्ही, मोबाईल, सेटटॉप बॉक्स असा सुमारे ६५ हजार ७०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यांच्यावर जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक निरिक्षक वाय. सी. पाटील करत आहेत.