लोहशिंगवे प्लॅस्टिकमुक्त अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2019 09:51 PM2019-10-02T21:51:57+5:302019-10-02T21:54:01+5:30
नांदूरवैद्य : लोहशिंगवे येथे सरपंच संतोष जुन्द्रे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त सर्व ग्रामस्थांच्या वतीने प्लॅस्टिकमुक्त अभियान राबविण्यात आली. लोहशिंगवे येथील ग्रामस्थांनी नेहमीच गाव स्वच्छतेला प्राधान्य दिले असून गाव स्वच्छ करण्याचे उद्दिष्ट मनात धरून ही संयुक्तरित्या मोहीम राबविण्यात आली.

लोहशिंगवे येथील ग्रामस्थांनी महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या पाशर््वभूमीवर गाव स्वच्छ करण्यासाठी विशेष भारत शासनाच्या प्लास्टिक तसेच स्वच्छता अभियानाअंतर्गत गावातील मारु ती मंदिर परिसर, जिल्हा परिषद शाळेचा परिसर,अंतर्गत सिमेंट रस्ते, दलित वस्ती, आदी परिसरातील ठिकाणी गावातील ग्रामस्थांच्या वतीने व महिला बचत गटाच्या महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवल्यामुळे गाव स्वच्छ करण्यास मोठी मदत झाली आहे.गाव स्वच्छ ठेवणे ही गावातील प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे.प्रत्येकाने आपल्या घरासमोरील परिसर स्वच्छ ठेवला तर गाव स्वच्छ राहील त्यामुळे गावातील कोणत्याही व्यक्तीने प्लास्टिक, घाण व घरातील कचरा एकञ करून त्याची योग्य त्या ठिकाणी विल्हेवाट लावण्यात यावी अशी माहिती यावेळी सरपंच संतोष जुन्द्रे यांनी या स्वच्छता अभियानाप्रसंगी ग्रामस्थांना दिली. यानंतर मारूती मंदिरापासून ते ग्रामपंचायत कार्यालय या मुख्य रस्त्यावरील प्लास्टिक घाण व कचरा एकञ करून कच-याची योग्य ठिकाणी विल्हेवाट लावण्यात आली.
या प्लास्टिकमुक्त मोहिमेत सरपंच संतोष जुन्द्रे,माजी उपसरपंच शिवाजी डांगे, उपसरपंच रतन पाटोळे, भाऊसाहेब जुन्द्रे, मनिषा जैन, मीना पाटोळे, योगीता जुंन्द्रे, आरती मोरे, संगीता माळी, शरद वाघचौरे, किसन साळवे, आंबादास मोरे, सखाराम मोरे,गणेश मोरे, योगेश औचार, रवींद्र बर्डे, कचरु गधें, संदीप गधें, अशोक पाटोळे, गधें, रवींद्र पाटोळे, आशासेविका दिपाली पाटोळे, मनिषा गंधे, महिला बचत गटाच्या महिला ग्रामपंचायतीचे सदस्य तसेच ग्रामस्थ मोठयÞा संख्येने सहभागी झाले होते.