सिडकोत अनियमित धान्य पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2020 10:17 PM2020-04-29T22:17:42+5:302020-04-29T23:34:10+5:30
सिडको : महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेले रेशन धान्य लाभार्थ्यांना देण्यास दुकानदार टाळाटाळ करीत असून, यासंदर्भात मनपाचे माजी विरोधी पक्षनेते तथा नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी चौकशीची मागणी केली आहे.
सिडको : महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेले रेशन धान्य लाभार्थ्यांना देण्यास दुकानदार टाळाटाळ करीत असून, यासंदर्भात मनपाचे माजी विरोधी पक्षनेते तथा नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी चौकशीची मागणी केली आहे. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन संबंधित रेशन दुकानदारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
स्वस्त धान्य दुकानदार अल्प उत्पन्न गटासाठी धान्य पुरवठा करीत नाही. रेशन कार्डवर ५९ हजारापर्यंत उत्पन्न लिहिलेले आहे, पण धान्याचा पुरवठा होत नाही. त्यांनी आॅनलाइन रजिस्ट्रेशन केलेले नाही म्हणून तुम्हाला धान्य देता येणार नाही, अशी सबब स्वस्त धान्य रेशन दुकानदार देत आहे. गरजूंना धान्य मिळावे यासाठी सरकार व पालकमंत्री सातत्याने नागरिकांची अडवणूक करू नका, असे आवाहन दुकानदारांना करीत असले तरी प्र्रत्यक्षात मात्र नागरिकांची अडवणूक होत आहे. आॅनलाइन रजिस्ट्रेशन आहे, मात्र त्यांना धान्य दिले जात नाही अशी तक्रार बडगुजर यांनी केली आहे. यासंदर्भात सिडकोतील दुकान नंबर २०९, १३७, १७७, १७८, १४८, १३७ या दुकानांच्या विरोधात त्यांनी तक्रार केली आहे. या दुकानदारांकडील रेशन कार्डधारकांची संख्या तपासून धान्य पुरवठ्यासाठी मागणीनुसार कार्यवाही करावी जेणेकरून प्रत्येक व्यक्तीस धान्य मिळेल, असे या निवेदनामध्ये नगरसेवक बडगुजर यांनी नमूद केले आहे.