आरोग्य विभागावर अनियमिततेचा ठपका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 12:33 AM2018-05-08T00:33:43+5:302018-05-08T00:33:43+5:30
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील कामकाजाबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे.
नाशिक : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील कामकाजाबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे. आरोग्य विभागाच्या कामकाजात अनियमितता असल्याचे नोटिसीत नमूद करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांतील बंधपत्रित वैद्यकीय अधिकाºयांकडे मेडिकल कौन्सिलकडून देण्यात येणारे रजिस्ट्रेशन नसतानादेखील याबाबतच्या कागदपत्रांची पडताळणी न करता नस्ती सादर करणे, शासन निकषांकडे दुर्लक्ष करून ९८ वैद्यकीय अधिकाºयांचे रजा मंजुरीचे प्रस्ताव दिरंगाईने सादर करणे, महाराष्ट्र वैद्यकीय सेवा व आरोग्य सेवा गट अ या संवर्गातील वैद्यकीय अधिकाºयांचे प्रस्ताव नियमानुसार तयार न करता तसेच तपासणी न करता सादर करणे याबाबत सदरची नोटीस बजावण्यात आली असून, याबाबत खुलासा मागविण्यात आला आहे.