पाटबंधारेची वसाहत मोडकळीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2020 10:54 PM2020-09-08T22:54:24+5:302020-09-09T00:53:05+5:30
नांदूरशिंगोटे : येथील पाटबंधारे विभागाच्या इमारतीची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, इमारतीवरील पत्रे उडाले आहेत. सर्वच इमारतींंना गाजर गवत व काटेरी झुडपांनी विळाखा घातला आहे.
सुरगाणा तालुक्यातील पळसन येथील शासकीय आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाची झालेली दुरवस्था.
नांदूरशिंगोटे : इमारतींची दुरवस्था; कर्मचारी निवासस्थानांचे पत्र उडाले
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदूरशिंगोटे : येथील पाटबंधारे विभागाच्या इमारतीची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, इमारतीवरील पत्रे उडाले आहेत. सर्वच इमारतींंना गाजर गवत व काटेरी झुडपांनी विळाखा घातला आहे.
येथे नाशिक पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत सिंचन शाखेचे कार्यालय व वसाहत आहे. तालुक्यातील सर्वात मोठे असणाºया भोजापूर धरणाची निर्मिती झाल्यानंतर येथे कार्यालय व कर्मचाऱ्यांसाठी वसाहत थाटण्यात आली आहे. परंतु गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून वसाहतीची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली
आहे. कार्यालय, कर्मचारी निवासस्थान, विश्रामगृह, चौकीदार कक्ष, गोडाउन, तार आॅफिस आदींच्या इमारती मोडकळीस आल्या आहेत. गोडाउन व कर्मचारी निवासस्थानाचे पत्रे उडून गेलेले आहेत. त्यामुळे भोजापूर धरणाच्या कार्यालयाकडे जाणेही अवघड झाले आहे.
कार्यालयातील वीजपुरवठा खंडित असून रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य असते. त्यामुळे पाटबंधारे विभागाचे कार्यालय व वसाहत मरणयातना सोसत असल्याचे चित्र आहे.सुरगाणा : जीव मुठीत धरून कर्मचाºयांचे वास्तव्यसुरगाणा : अतिवृष्टीमुळे सुरगाणा तालुक्यातील पळसन येथील शासकीय आश्रमशाळेतील कर्मचारी निवासस्थानांची दुरवस्था झाली असून, जीव मुठीत धरून वास्तव्य करावे लागत आहे.
पळसन येथे शासकीय आश्रमशाळेतील अधीक्षक, मुख्याध्यापक व कर्मचारी याची निवासस्थानं जुनी असल्याने छपरावर मोठे गवत उगवले असून झाडे उगवल्याने भिंतींना तडे गेले आहेत. या झाडांची मुळे घरात आतील बाजूस भिंतीवरदेखील स्पष्टपणे दिसतात. परिसरात गवत उगवले असल्याने घरात विंचू, सर्प इत्यादी प्राणी केव्हाही प्रवेश करण्याची भिती कायम असते. त्यामुळे अशा निवासस्थानी रहात असलेले सर्व कुटुंब व कमर्चारी विशेषता रात्रीचे वेळी भीतीच्या दडपणाखाली असतात. संबंधितांनी दुर्दशा झालेल्या या निवासस्थानांची दुरुस्ती करण्याची मागणी केली जात आहे.
सुरगाणा येथील पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांच्या निवास इमारतींची अवस्थादेखील फार काही चांगली नाही. वनविभाग अधिकारी व कर्मचाºयांचे जुनी असलेली निवासचाळ कुणीही रहात नसल्याने चहूबाजूंनी मोठी झाडे उगवल्याने व छपरावर मोठ्या प्रमाणात पालापाचोळा साठल्याने ही जूनी दगडी बांधकाम असलेली निवास चाळ अधोगतीकडे चालली आहे. तर आरोग्य विभाग निवास इमारतींची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. याठिकाणी इमारतींचे अवशेष दिसतात.
सुरगाणा शहरासह तालुक्यातील अशा निवासस्थानांची दुरुस्ती करून किंवा नवीन बांधकाम करून शासकीय अधिकारी व कमर्चारी यांची रहाण्याची गैरसोय दूर करण्याची मागणी केली जात आहे.