लघुपाटबंधारे विभागाचे वाहन धूळखात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 09:31 PM2020-07-17T21:31:46+5:302020-07-18T00:41:17+5:30
वेळुंजे : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पाणीटंचाईच्या कार्यक्षेत्रातील हरसूल येथील उपविभागीय लघु पाटबंधारे विभागाचे वाहन दीड वर्षापासून अडगळीच्या जागेवर धूळखात पडल्याचे चित्र दिसून येत आहे. संबंधित अधिकाऱ्यांना खासगी वाहनाने कार्यक्षेत्रात फेºया मारण्याची वेळ आली आहे.

हरसूल येथे जिल्हा परिषद लघुपाटबंधारे उपविभागाचे कार्यालय आहे. या कार्यालयामार्फत हरसूलसह परिसरात लघु पाटबंधारे विभागअंतर्गत कार्यक्षेत्रात अधिकाऱ्यांकडून दैनंदिन कामकाज बघण्यासाठी वाहन देण्यात आले आहे. मात्र, ते वाहन दीड वर्षांपासून नादुरुस्त अवस्थेत आहे. यामुळे अधिकाºयांना खासगी वाहनाने कार्यक्षेत्रात फेºया मारण्याची वेळ आली आहे. हरसूल येथील लघुपाटबंधारे उपविभाग कार्यालयाला संरक्षक भिंत असूनही एका खासगी जागेत हे वाहन धूळखात पडून आहे. यामुळे या नादुरुस्त वाहनाच्या दुरवस्थेत दिवसेंदिवस भर पडत आहे.
-----------------------------------
गेल्या दीड वर्षापासून संबंधित वाहन नादुरुस्त आहे. गाडीच्या साहित्याच्या चोरीमुळे ते वाहन निर्लेखित करण्यात आले आहे. लवकरच नवे वाहन मिळाल्यास इतर कर्मचाºयांची खासगी वाहनाने करावी लागणारी धावपळ थांबू शकेल.
- भगवान वनमाने, सेवानिवृत्त उपअभियंता
लघुपाटबंधारे हा विभाग महत्त्वाचा असल्याने अधिकाºयांना खासगी वाहनाने कार्यक्षेत्रावर कामकाज करावे लागत आहे. मिळालेले वाहन निर्लेखित झाल्याने ते कार्यालय आवारात असायला हवे. तसेच वाहनाची दिवसेंदिवस होणारी दुरवस्था थांबवावी.
- मिथुन राऊत, शिवसेना उपतालुका प्रमुख, त्र्यंबकेश्वर