सिंचन : पाण्याची चोरी रोखण्यासाठी विविध उपाययोजना येवला, निफाडसाठी पालखेडमधून पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 01:28 AM2018-02-09T01:28:48+5:302018-02-09T01:28:59+5:30

नाशिक : येवला, निफाड, दिंडोरी तालुक्यातील काही गावांसाठी सिंचन व बिगर सिंचनासाठी राखून ठेवलेले पाणी पालखेड धरणातून सोडण्यास सुरुवात झाली .

Irrigation: Different measures have been taken to prevent theft of water, water from Palakhedam for Niphad | सिंचन : पाण्याची चोरी रोखण्यासाठी विविध उपाययोजना येवला, निफाडसाठी पालखेडमधून पाणी

सिंचन : पाण्याची चोरी रोखण्यासाठी विविध उपाययोजना येवला, निफाडसाठी पालखेडमधून पाणी

googlenewsNext

नाशिक : येवला, निफाड, दिंडोरी तालुक्यातील काही गावांसाठी सिंचन व बिगर सिंचनासाठी राखून ठेवलेले पाणी पालखेड धरणातून सोडण्यास सुरुवात झाली असून, पालखेड कालव्याद्वारे सोडण्यात येणाºया या पाण्याची चोरी रोखण्याच्या सूचना पाटबंधारे खात्याला करण्यात आली आहे. जिल्ह्यातील धरणाच्या पाणी आरक्षणात निफाड, नाशिक, दिंडोरी, येवला या तालुक्यांसाठी सिंचन व पिण्यासाठी पाणी आरक्षित करण्यात आले आहे. त्यानुसार पालखेड धरणातून बुधवारपासून ८०० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. सध्या सातशे क्यूसेक या वेगाने पाणी सोडण्यात येत असून, साधारणत: पंधरा दिवस पाण्याचा प्रवाह सुरू राहील. या आवर्तनातून शेतीसाठी तसेच पाणीपुरवठा योजनांसाठी पाणी देण्यात येईल. पाण्याची चोरी रोखण्यासाठी पाटबंधारे खात्याला दक्षतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Web Title: Irrigation: Different measures have been taken to prevent theft of water, water from Palakhedam for Niphad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.