सिंचन, पेयजलाचा प्रश्न गंभीर

By admin | Published: January 10, 2016 10:09 PM2016-01-10T22:09:34+5:302016-01-10T22:14:01+5:30

येवल्याचे पाणी पेटणार : सोमवारी जलहक्क संघर्ष समितीचे आमरण उपोषण

Irrigation, drinking water issue serious | सिंचन, पेयजलाचा प्रश्न गंभीर

सिंचन, पेयजलाचा प्रश्न गंभीर

Next

 येवला : तालुक्याला थोडासा दिलासा देऊ शकणारे पालखेड डाव्या कालव्याचे पाणीही आता येवल्याला मिळणे मुश्कील झाले आहे. या परिस्थितीत पाण्याच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिले नाहीतर येवल्याला पिण्याचे पाणी मिळणेही मुश्कील होईल.
सातत्याने दुष्काळाचा सामना करणाऱ्या येवला तालुक्यातील सिंचनाचा, पेयजलाचा एकूण प्रश्न ऐरणीवर आला आहे. येवल्याचा सिंचनाचा व पेयजलाचा प्रश्न सोडवायचा असेल तर १६ मागण्या मान्य करा व येत्या २० वर्षांतील येवला तालुका व शहराची लोकसंख्या गृहीत धरून पाण्याचा प्रश्न सोडवावा, यासाठी समितीचे कार्यकर्ते येवला तहसील कार्यालयासमोर ११ आॅगस्टपासून आमरण उपोषणास बसणार आहेत. या विषयाचे निवेदन जलसंपदा तथा पालकमंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री छगन भुजबळ तसेच विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी दीपेंद्र कुशवाह, पालखेड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंपी, लघुसिंचन जलसंधारणचे मुख्य अभियंता के. एस. ठाकरे, गिरणा खोरे प्रकल्प विभागाचे मुख्य अभियंता अनिल मोरे, प्रांताधिकारी वासंती माळी, तहसीलदार शरद मंडलिक यांना देण्यात आले. जलहक्क संघर्ष समितीने सिंचनाचा प्रश्न सोडविण्यासाठी निवेदनात विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. त्यात कोळगाव येथील कोळगंगा नदीवर असलेल्या पाझर तलावाची क्षमता दुप्पट करावी, मांजरपाडा-१ प्रकल्प पूर्ण करून पुणेगाव-डोंगरगाव कालव्याला पाणी पोहोच करण्याचा कालबद्ध कार्यक्र म जाहीर करावा, संपूर्ण तालुक्यातील अनकाई डोंगराच्या रांगा आणि दक्षिणेस असलेल्या गोदावरी नदीदरम्यान तालुक्यातील सर्व नदीपात्रांमध्ये पाच दलघफूचे सीमेंट साखळी बंधारे बांधावे, सर्व नद्या- नाल्यांचे रुंदीकरण, खोलीकरण करावे व पाणी अडवावे आदि मागण्यांच्या समावेश आहे. आंदोलनाच्या पहिल्या दिवशी तहसील कार्यालयासमोर घंटानाद केला जाऊन मागण्यांचे निवेदन दिल्यानंतर उपोषणास प्रारंभ होणार आहे, अशी माहिती देण्यात आली. तसेच ज्या गावांची पालखेडच्या पाण्यातून आरक्षित बंधारे भरून देण्याची मागणी आहे अशा गावांमधून शेतकरीवर्गाने व सर्व राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावे व आंदोलनात आपला सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे. (वार्ताहर)

Web Title: Irrigation, drinking water issue serious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.