इसिसबाबकाश्मीरचा मुद्दा संपला : हंसराज अहिर
By admin | Published: August 21, 2016 11:42 PM2016-08-21T23:42:43+5:302016-08-21T23:55:11+5:30
इसिसबाबकाश्मीरचा मुद्दा संपला : हंसराज अहिर
नाशिक : भारत व पाकिस्तान या दोन्ही देशांमधील संबंध सुधारावेत, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेकदा प्रयत्न केले, मात्र पाकिस्तान सुधारण्याच्या स्थितीत नाही़ प्रत्येक वेळी काश्मीरचा मुद्दा उपस्थित करून भारतात दहशतवादी कारवाया करणाऱ्या पाकिस्तानसमोर पंतप्रधान मोदींनी पाकव्याप्त काश्मीरचा मुद्दा उपस्थित करून राजकीय मुत्सद्देगिरी दाखविल्याने पाकची कोंडी झाली आहे. त्यामुळे पाकिस्तानसमोर आता केवळ पाकव्याप्त काश्मीरचा विषय शिल्लक राहिला आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केले.
देशाच्या ७० व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद मोदी यांनी केंद्रीय मंत्री व खासदारांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या प्रत्येक जिल्ह्यातील प्रमुख ठिकाणांना भेट देण्यास सांगितले होते़ त्यानुसार नाशिकमधील स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मस्थान भगूर व येवला येथील स्वातंत्र्यसेनानी तात्या टोपे यांच्या स्मारकास केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर व रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी रविवारी भेट दिली़ यानंतर शहर भाजपा कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत अहिर बोलत होते़
काश्मिरबाबत भारताच्या भूमिकेविषयी अहिर म्हणाले, आतापर्यंत पाकिस्तान केवळ काश्मिरच्या मुद्दा पुढे करून त्याबाबत आंतरराष्ट्रीय पटलावर मुद्दा उपस्थित करण्याच्या कारवाया करीत होते. काश्मिरबाबत पाकिस्तानची पूर्वीचीच भूमिका आजही कायम असली तरी पंतप्रधानाच्या भूमिकेमुळे काश्मिरचा मुद्दा वेगळ्या वळणावर आला आहे. पाकव्याप्त काश्मिरमधील बलुचिस्तानमधील नागरिकांनीच पाकिस्तानपासून स्वातंत्र्य मिळविण्याची मागणी केली आहे़ बलुचिस्तानमधील नागरिकांच्या प्रश्नाकडे पंतप्रधान मोदी यांनी लक्ष वेधून काश्मिरबाबतच्या चर्चेला कलाटणी दिल्याने काश्मिरचा मुद्दाही बदलला असल्याचे अहिर म्हणाले.
भारताची काश्मिरबाबत भूमिका स्पष्ट असून याबाबत पाकिस्तानचा हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही़ पाकिस्तानची ताकद आम्ही ओळखून असून यापूर्वी तीन वेळा त्यांना भारताने धूळ चारली आहे़ पाकिस्तानने आपल्या ताकदीचा भारताविरोधी वापर करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल़असेही अहिर पत्रकार परिषदेत म्हणाले.
त केंद्र गंभीर देशभरातील केरळ तसेच प्रामुख्याने महाराष्ट्राच्या मराठवाड्यातील इसिसच्या प्रसाराबाबत केंद्र सरकार गंभीर आहे़ महाराष्ट्रातील मराठवाडा व परभणीतील इसिसच्या प्रभावाबाबतचा अहवाल राज्य सरकारकडून मागविण्यात आला आहे़ यामध्ये राज्य सरकारच्या सूचनेप्रमाणे तथ्य आढळल्यास केवळ राज्याचीच नव्हे तर केंद्राची संपूर्ण तपासी यंत्रणा याचा मूळापर्यंत शोध घेईल़ तसेच जी कुटुंबे इसिसच्या प्रभावाखाली असतील त्यांना यातून संपूर्णत: बाहेर काढेपर्यत हे काम सुरू राहणार असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री अहिर यांनी सांगितले़