इस्लामी नववर्ष आज संध्याकाळपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 01:11 AM2017-09-22T01:11:53+5:302017-09-22T01:12:05+5:30

इस्लामी कालगणनेच्या हिजरी सन १४३९ला आज संध्याकाळपासून प्रारंभ होण्याची शक्यता वर्तविली जात होती; मात्र चंद्रदर्शन राज्यात कोठेही घडले नाही. शहरातून चंद्रदर्शन घडल्याची ग्वाही प्राप्त होऊ शकली नाही. शुक्रवारी संध्याकाळपासून नववर्षाला प्रारंभ होणार असल्याचा निर्णय धर्मगुरूंकडून बैठकीत घेण्यात आला.

Islamic New Year's Eve | इस्लामी नववर्ष आज संध्याकाळपासून

इस्लामी नववर्ष आज संध्याकाळपासून

Next

नाशिक : इस्लामी कालगणनेच्या हिजरी सन १४३९ला आज संध्याकाळपासून प्रारंभ होण्याची शक्यता वर्तविली जात होती; मात्र चंद्रदर्शन राज्यात कोठेही घडले नाही. शहरातून चंद्रदर्शन घडल्याची ग्वाही प्राप्त होऊ शकली नाही. शुक्रवारी संध्याकाळपासून नववर्षाला प्रारंभ होणार असल्याचा निर्णय धर्मगुरूंकडून बैठकीत घेण्यात आला.
गुरुवारी (दि.२१) उर्दू महिना ‘जिलहिज्जा’ची २९ तारीख असल्याने संध्याकाळी चंद्रदर्शन घडण्याची शक्यता वर्तविली जात होती. या पार्श्वभूमीवर शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी यांच्या अध्यक्षतेखाली शाही मशिदीत बैठक झाली. ढगाळ हवामानामुळे रात्री उशिरापर्यंत चंद्रदर्शन कोठेही घडल्याची माहिती नाशिक विभागीय चांद समितीला मिळाली नाही. चांद समिती व धर्मगुरूंच्या झालेल्या बैठकीत चालू महिन्याचे तीस दिवस पूर्ण करून शुक्रवारी संध्याकाळपासून हिजरी सन १४३९चा पहिला महिना मुहर्रमची एक तारीख सुरू होईल, असे जाहीर करण्यात आले. इस्लामी कालगणनेचा पहिला महिना म्हणून ‘मुहर्रमुल हराम’ ओळखला जातो. हा महिना धर्माचे प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांच्या प्रिय कन्या हजरत फातिमा यांचे पुत्र शहीद हजरत इमाम-ए-हूसेन यांच्या स्मृतींना उजाळा देणारा आहे.

Web Title: Islamic New Year's Eve

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.