सिडकोतील शांतीनगरमध्ये जळालेल्या इसमाचा मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2018 11:28 PM2018-12-05T23:28:17+5:302018-12-05T23:28:57+5:30
नाशिक : जळालेल्या अवस्थेत मानवी मृतदेह आढळून आल्याची घटना बुधवारी (दि़५) दुपारच्या सुमारास अंबडमधील शांतीनगर परिसरात घडली़ या मृतदेहाची ओळख पटलेली नसून या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहितीनुसार बुधवारी दुपारच्या सुमारास अंबड येथील शांतीनगर परिसरात जळालेला मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळाली़ त्याुनसार पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक पोलीस आयुक्त शांताराम पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमनाथ तांबे, दिनेश बर्डेकर यांसह पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहचले़ मृतदेह हा पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत असल्याने तो स्त्री की पुरुषाचा याबाबतची माहिती समोर आलेली नाही़
पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर श्वान पथक व फॉरेन्सिक विभागास याठिकाणी पाचारण करण्यात आले होते़ त्यांच्या अहवालानंतरच मृतदेह नेमका स्त्रीचा की पुरुषाचा तसेच घटनेचा उलगडा होणार आहे़ दरम्यान, या घटनेचा लवकरच उलगडा करून गुन्हेगारांपर्यंत पोहचण्याचा विश्वास अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमनाथ तांबे यांनी व्यक्त केला आहे.