न्यायमूर्तींच्या निवासस्थानी लपलेल्या इसमास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 09:50 PM2020-12-30T21:50:42+5:302020-12-31T00:17:32+5:30

लासलगाव : निफाड येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती एम. एस. कोचर यांच्या न्यायालयातील शासकीय निवासस्थानी दोन दिवसांपूर्वी रात्री अनधिकृतपणे दारू पिऊन प्रवेश करून लपून बसलेल्या दीपक विश्वनाथ जाधव या इसमास अटक करण्यात आली. त्याची नंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

Ismas, who was hiding at the judge's residence, was arrested | न्यायमूर्तींच्या निवासस्थानी लपलेल्या इसमास अटक

न्यायमूर्तींच्या निवासस्थानी लपलेल्या इसमास अटक

Next
ठळक मुद्देनिफाड : संशयिताची न्यायालयीन कोठडीत केली रवानगी

लासलगाव : निफाड येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती एम. एस. कोचर यांच्या न्यायालयातील शासकीय निवासस्थानी दोन दिवसांपूर्वी रात्री अनधिकृतपणे दारू पिऊन प्रवेश करून लपून बसलेल्या दीपक विश्वनाथ जाधव या इसमास अटक करण्यात आली. त्याची नंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, निफाड पोलीस कार्यालयात नेमणुकीस असलेले पोलीस मुख्यालयाचे पोलीस शिपाई राजेंद्र शिवाजी मिस्तरी यांनी फिर्यादी दिली आहे. निफाड येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आवारात अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती एम. एस. कोचर यांच्या निवासाची व्यवस्था आहे. या निवासस्थानी शनिवारी (दि. २६) रात्री ११ वाजेच्या सुमारास ते प्रवेशद्वारावर ड्युटीवर असताना शिपाई बाबासाहेब चव्हाण यांनी फोन करून न्यायाधीश श्रीमती कोचर यांच्या बंगल्याच्या आवारात एक इसम लपून बसलेला आहे, असे कळविले. त्यानंतर पोलीस शिपाई राजेंद्र मिस्तरी, निफाड पोलीस कार्यालयाचे एएसआय थेटे, देशमुख, राठोड यांनी त्यास पकडले. तो दारू प्यायला होता. दीपक विश्वनाथ जाधव (३९, रा. गोरेवाडी, जेल रोड, डायमंड रो हाउस, नाशिक) या इसमास अटक करण्यात आली.

निफाड पोलीस कार्यालयात त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. भादंवि कलम ४४७ अन्वये व दारूबंदी कलम ८५ (१) व महाराष्ट्र पोलीस कायदा १२२नुसार विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास निफाडचे पोलीस निरीक्षक आर. बी. सानप यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Web Title: Ismas, who was hiding at the judge's residence, was arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.