प्रादेशिक परिवहन कार्यालयाला आयएसओ मानांकन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:12 AM2021-01-10T04:12:08+5:302021-01-10T04:12:08+5:30
नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयात संगणकाद्वारे तब्बल २३ वर्षांपूर्वी १९९७ मध्ये वाहन नोंदणी व अनुज्ञप्तीबाबतचे काम सुरू करण्यात आले होते. ...
नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयात संगणकाद्वारे तब्बल २३ वर्षांपूर्वी १९९७ मध्ये वाहन नोंदणी व अनुज्ञप्तीबाबतचे काम सुरू करण्यात आले होते. सुरुवातीला टूल्स ऑफलाइन प्रणाली माध्यमातून कामाला सुरुवात करण्यात आली होती.
प्रादेशिक परिवहन कार्यालयात आतापर्यंत १७ लाख ८४ हजार ७६४ वाहनांचे अभिलेखे संगणकीकृत केले आहे तर १ लाख २० हजार ९९५ अनुज्ञाप्ती काम करण्यात आलेले आहे. या कार्यालयाने २००३ पासून संगणक प्रणालीवर चाचणीला सुरुवात केली होती. त्यानंतर शासनाने राज्यभरात सदर प्रणालीद्वारे अपॉइंटमेंट सुविधा चाचणी घेण्यास प्रारंभ केला. या संगणक प्रणालीद्वारे जानेवारी २०१७ ते ३१ डिसेंबर २०२० पर्यंत जवळपास १ लाख आठ हजार ६०४ चाचण्या घेतल्या, त्यापैकी ८९ हजार ३२९ अर्जदार उत्तीर्ण झाले. देशात सर्वप्रथम आणि यशस्वी असा राबविण्यात आलेला प्रकल्प स्वयंचलित वाहन तपासणी केंद्र असून, ऑक्टोबर २०१५ ते डिसेंबर २०२० या पाच वर्षांच्या काळात १ लाख ३८ हजार ९१९ वाहने तपासणी करण्यात आली आहेत. दरवर्षी होणाऱ्या रस्ते अपघातात युवकांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे मागील ३ वर्षांपासून पक्क्या अनुज्ञप्तीकामी अर्जदाराला प्रशिक्षण बंधनकारक करण्यात आले आहे तर कोविडच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून १ डिसेंबरपासून ऑनलाइन प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
इन्फो===
नाशिकच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे पूर्णपणे डिजिटायझेशन झाले आहे तर अनुज्ञप्ती वाहननोंदणीसंबंधी ४० लाखापेक्षा अधिक डिजिटल नोंदणी आहे. रस्ते सुरक्षा सप्ताह तसेच सुरक्षित वाहन चालविणे असे विविध उपक्रम कार्यालयामार्फत राबविण्यात येतात.
-भरत कळसकर, प्रादेशिक परिवहन अधिकारी.
Attachments area