सिन्नर शहरातील कोविड १९ रुग्णालयास आयसोलेशन बेड्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2020 10:22 PM2020-06-13T22:22:23+5:302020-06-14T01:29:47+5:30
सिन्नर : येथील हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड कंपनीच्या वतीने ग्रामीण रुग्णालयास ३० आयसोलेशन बेड्स देण्यात आले. येथील सिन्नर ग्रामीण रुग्णालयात कोविड रुग्णालयाची स्थापना करण्यात आली आहे.
सिन्नर : येथील हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड कंपनीच्या वतीने ग्रामीण रुग्णालयास ३० आयसोलेशन बेड्स देण्यात आले. येथील सिन्नर ग्रामीण रुग्णालयात कोविड रुग्णालयाची स्थापना करण्यात आली आहे.
हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीने केंद्र सरकारला १०० कोटी, तर राज्य सरकारला १० कोटी रुपयांचे पी.पी.ई. किटची मदत केली आहे.
तहसीलदार राहुल कोताडे, जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन बच्छाव, सिन्नर ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. निर्मला पवार, नगर परिषदेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खैरनार, डॉ. लहू पाटील, पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील यांच्याकडे हे ३० आयसोलेशन बेड्स सुपूर्द करण्यात आले. यावेळी हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेडचे सिन्नरचे व्यवस्थापक अर्पण आनंद, पवन कडलग, मधुकर कदम, लेबर कॉन्ट्रक्टर विनोद शितोळे यांच्यासह कंपनीचे अधिकारी, कर्मचारी व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
-----------------
तालुक्यात कोरोना रु ग्णांची संख्या
मोठ्या प्रमाणात वाढली होती. त्यामुळे कोरोना रु ग्णांच्या संपर्कातील
नागरिकांनाही तपासणीसाठी सिन्नर
ग्रामीण रु ग्णालयात आणले जाते. त्या पार्श्वभूमीवर हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीने मदत केली.