आयसोलेशन कोचची रेल्वे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2020 01:55 AM2020-04-28T01:55:35+5:302020-04-28T01:56:21+5:30
नाशिक जिल्ह्यातील कोरोना रुग्णाची वाढती संख्या लक्षात घेता रेल्वेने आयसोलेशन कक्ष असलेली खास रेल्वेगाडी बनविली आहे. या रेल्वेचे नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर आगमन झाले आहे. मालेगाव येथील रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन रेल्वे मंत्रालयाच्या परवानगीनंतर ही रेल्वे मनमाड स्थानकावर नेली जाणार आहे.
नाशिक : जिल्ह्यातील कोरोना रुग्णाची वाढती संख्या लक्षात घेता रेल्वेने आयसोलेशन कक्ष असलेली खास रेल्वेगाडी बनविली आहे. या रेल्वेचे नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर आगमन झाले आहे. मालेगाव येथील रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन रेल्वे मंत्रालयाच्या परवानगीनंतर ही रेल्वे मनमाड स्थानकावर नेली जाणार आहे.
या रेल्वेमध्ये कोरोना रुग्णांसाठी स्वतंत्र आयसोलेशन कक्ष निर्माण केले असून, त्यामध्ये त्यांना गरज असलेल्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत.
मालेगावजवळ असलेल्या मनमाड रेल्वे स्टेशनवर ही रेल्वे नेऊन त्याद्वारे मालेगावमधील रुग्णांना त्याचा लाभ मिळू शकणार आहे. यासाठी रेल्वे प्रशासनाकडे परवानगी मागितली असून, ती मिळाल्यावर ही रेल्वे मनमाड रेल्वे स्थानकावर पाठविली जाईल, अशी माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली आहे.