विलगीकरण कक्ष : दात्यांच्या मदतीने उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 06:29 PM2021-04-24T18:29:57+5:302021-04-24T18:30:43+5:30

लोहोणेर : येथील जनता विद्यालयात सुरू करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षात दाखल झालेल्या कोरोना रुग्णांच्या सी.आर.पी. व सी.बी.सी. तपासण्या करण्यात येणार असल्याचा निर्णय कोरोना नियंत्रण समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. लोहोणेर येथे कोरोना नियंत्रण समितीचे वतीने जनता विद्यालयात आवारात कोरोना विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षात सुमारे १५ रुग्ण आहेत. कोरोना नियंत्रण समितीचे वतीने रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत.

Isolation Room: Treatment with the help of donors | विलगीकरण कक्ष : दात्यांच्या मदतीने उपचार

विलगीकरण कक्ष : दात्यांच्या मदतीने उपचार

googlenewsNext
ठळक मुद्देलोहोणेरला कोरोना नियंत्रण समितीमार्फत रुग्णांच्या तपासण्या

लोहोणेर : येथील जनता विद्यालयात सुरू करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षात दाखल झालेल्या कोरोना रुग्णांच्या सी.आर.पी. व सी.बी.सी. तपासण्या करण्यात येणार असल्याचा निर्णय कोरोना नियंत्रण समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. लोहोणेर येथे कोरोना नियंत्रण समितीचे वतीने जनता विद्यालयात आवारात कोरोना विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षात सुमारे १५ रुग्ण आहेत. कोरोना नियंत्रण समितीचे वतीने रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत.

स्थानिक डॉक्टर व आरोग्य केंद्रातील कर्मचारी येथील रुग्णांची दररोज दोन वेळा तपासणी करत आहे. याठिकाणी दाखल करण्यात आलेल्या रुग्णांची सी.आर.पी.व सी.बी.सी. तपासण्या कोरोना नियंत्रण समितीच्या वतीने करण्यात येणार असून या तपासण्यानंतर पुढील उपचार करणे सोपे होणार आहे.
या विलगीकरण कक्षाच्या मदतीसाठी अनेक दानशूर व्यक्तींचे हात पुढे आले आहेत. कोणी रुग्णांची सेवा करावी म्हणून रोख रक्कम तर कोणी वस्तू स्वरूपात वेगवेगळ्या प्रकारे मदत करीत आहेत. या केंद्रास २२००१ रुपयांची रोख मदत दात्यांनी केली असून काहींनी रुग्णांना औषधे, नाष्टा, चहा, काढा आदी सेवा मोफत देण्यात येतआहेत.

शनिवारी (दि.२४) ग्रामपंचायत सभागृहात कोरोना नियंत्रण समितीच्या सदस्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीस योगेश पवार, रमेश आहिरे, पंडित पाठक, दिगंबर कोठावदे, रतीलाल परदेशी, राकेश गुळेचा, गणेश शेवाळे, संजय सोनवणे, नाना जगताप, दीपक देशमुख, समाधान महाजन, यशवंत जाधव सोपान सोनवणे, पोलीस पाटील अरुण उशीरे, ग्रामविकास अधिकारी यु. बी. खैरनार आदी उपस्थित होते.

Web Title: Isolation Room: Treatment with the help of donors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.