नाशिकरोड रेल्वेस्थानकात आयसोलेशन ट्रेन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2020 10:28 PM2020-04-28T22:28:10+5:302020-04-28T23:00:33+5:30

नाशिकरोड : कोरोनाच्या संशयितांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यासाठी जागेची टंचाई येत असल्याने मध्य रेल्वेने आयसोलेशनची विशेष सुविधा असलेल्या रेल्वेगाड्या विकसित केल्या आहेत. नाशिकरोड रेल्वेस्थानकात २२ डब्यांची अशी गाडी दाखल झाली आहे.

 Isolation train at Nashik Road railway station | नाशिकरोड रेल्वेस्थानकात आयसोलेशन ट्रेन

नाशिकरोड रेल्वेस्थानकात आयसोलेशन ट्रेन

Next

नाशिकरोड : कोरोनाच्या संशयितांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यासाठी जागेची टंचाई येत असल्याने मध्य रेल्वेने आयसोलेशनची विशेष सुविधा असलेल्या रेल्वेगाड्या विकसित केल्या आहेत. नाशिकरोड रेल्वेस्थानकात २२ डब्यांची अशी गाडी दाखल झाली आहे.
कोरोना संशयितांची संख्या आगामी काळात वाढण्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. प्रशासनाने सरकारी रु ग्णालयांबरोबरच खासगी रुग्णालयांचीही मदत घेतली आहे. कोरोना संशयितांना पंधरा दिवस क्वॉरंटाइनमध्ये ठेवण्यासाठी शाळा, मंगल कार्यालये, समाजमंदिरे आदी अधिग्रहित करण्यात आली आहेत. आणखी काही ठिकाणे अधिग्रहित करण्यात येत आहेत. रेल्वेची मदत यासाठी घेण्यात येत आहे.
कोरोनाच्या संकटामुळे प्रवासी रेल्वेसेवा बंद आहेत. केंद्र सरकारने रेल्वे मंत्रालयाला प्रवासी रेल्वेगाड्या क्वॉरंटाइनसाठी तयार ठेवण्याचे निर्देश महिन्यापूर्वीच दिले होते. त्यानुसार काही गाड्यांमध्ये आवश्यक बदल करून बेड, पंखे, वैद्यकीय उपकरणे बसवून रेल्वेच्या विविध विभागांनी गाड्या तयार केल्या आहेत. मध्य रेल्वेने अशा गाड्या विकसित करून त्या मोजक्या स्थानकांमध्ये पाठविल्या आहेत. त्यातील एक गाडी नाशिकरोड रेल्वेस्थानकात आली आहे. मात्र अन्य शहरांमध्ये गरज भासल्यास ती तिकडेही पाठवली जाऊ शकते. स्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक ४ वर सध्या सदर गाडी उभी करण्यात आली आहे.
एकतर हा फलाट इतर तीन फलाटपेक्षा मोठा आहे. बावीस डब्यांची गाडी येथे सहज उभी राहू शकते. मालगाड्यांनादेखील तिचा अडथळा येत नाही. रेल्वे कर्मचारी, अधिकारी, कुली, सफाई कामगार यांचा वावर चौथ्या फलाटवर होत नाही. येथे रेल्वेची पार्सल, बुकिंग, रिझर्व्हेशन अशी कार्यालयेही नाहीत. संशयित कोरोना रु ग्णांना या विशेष गाडीत ठेवले तरी इतरांना लागण होणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे.
----
चौथ्या फ्लॅटफार्मवर तैनात
कुंभमेळ्यात बांधण्यात आलेल्या फलाट क्रमांक चारवर आयसोलेशन ट्रेन उभी आहे. नागरिकांना तेथे जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. रेल्वे सुरक्षा दलाचे जवान नाशिकरोड रेल्वेस्थानकाच्या सर्व प्रवेशद्वारांमध्ये तैनात करण्यात आले आहेत. सर्व प्रवेशद्वारे बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आली आहेत. ही गाडी सिन्नर फाट्याकडील चौथ्या फलाटवर ठेवण्यात आली आहे.

Web Title:  Isolation train at Nashik Road railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक