इस्रायल कॉन्सुलेट जनरलची निमाला भेट

By admin | Published: July 10, 2017 12:48 AM2017-07-10T00:48:12+5:302017-07-10T00:48:23+5:30

सातपूर : इस्रायलमधील उद्योगांनी नाशिकला गुंतवणूक करावी, अशी मागणी निमाच्या वतीने कॉन्सुलेट जनरल यांच्याकडे केली आहे.

Israel Consulate General's Avatar Visit | इस्रायल कॉन्सुलेट जनरलची निमाला भेट

इस्रायल कॉन्सुलेट जनरलची निमाला भेट

Next

लोकमत न्युज नेटवर्क
सातपूर : संरक्षण तंत्रज्ञान क्षेत्रात अग्रेसर असलेल्या इस्रायलमधील उद्योगांनी नाशिकला गुंतवणूक करावी, अशी मागणी निमाच्या वतीने नाशिक भेटीवर आलेल्या इस्रायल कॉन्सुलेट जनरल यांच्याकडे केली आहे.
भारत दौऱ्यावर आलेल्या इस्रायल कॉन्सुलेट जनरल डेव्हीड एकॉव, जनसंपर्कप्रमुख अनय जोगळेकर यांनी नाशिकला येऊन निमाला भेट दिली. निमा अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी यांनी त्यांचे स्वागत केले. ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत इस्रायलमधील उद्योगांनी नाशिकलाच गुंतवणूक करावी, असे आवाहन निमाच्या वतीने करण्यात आले. याप्रसंगी मंगेश पाटणकर, उदय खरोटे, हर्षद ब्राह्मनकर, नितीन वागस्कर, ज्ञानेश्वर गोपाळे, संजय सोनवणे आदींसह निमा पदाधिकारी उपस्थित होते. इंडियन मेडिकल असोसिएशनच्यानाशिक शाखेतर्फे ज्येष्ठ डॉक्टर व वैद्यकीय व्यवसायात योगदान असलेल्या डॉ. डी. जी. पेखळे, डॉ. अरूण स्वादी, डॉ. विजय कुऱ्हाडे यांचा जीवन गौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. रमेश पवार, सचिव मयुर सरोदे, खजिनदार डॉ. किशोर म्हस्के आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी डॉ. पेखळे, डॉ. स्वादी, डॉ. कुऱ्हाडे यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

Web Title: Israel Consulate General's Avatar Visit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.