पेसातील प्रतिनियुक्तीच्या कर्मचाºयांचा मुद्दा ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 11:26 PM2017-10-02T23:26:13+5:302017-10-02T23:26:23+5:30

नाशिक : मे महिन्यात झालेल्या कर्मचारी बदल्यांमधील काही कर्मचारी मुख्यालयातच काम करीत असल्याचा मुद्दा राष्टÑवादीच्या सदस्य नूतन सुनील अहेर यांनी दोन दिवसांपूर्वीच ऐरणीवर आणला असताना आता एकूणच पेसातील कर्मचारी व पदाधिकाºयांच्या स्वीय सहायकांच्या नेमणुकाही अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. मंगळवारी होणाºया सर्वसाधारण सभेत राष्टÑवादीचे व भाजपाचे काही सदस्य या मुद्द्यावरून सत्ताधारी शिवसेना व कॉँग्रेसला घेरण्याच्या तयारीत असल्याचे समजते.

Issue of Employee Employee Dept. | पेसातील प्रतिनियुक्तीच्या कर्मचाºयांचा मुद्दा ऐरणीवर

पेसातील प्रतिनियुक्तीच्या कर्मचाºयांचा मुद्दा ऐरणीवर

Next

नाशिक : मे महिन्यात झालेल्या कर्मचारी बदल्यांमधील काही कर्मचारी मुख्यालयातच काम करीत असल्याचा मुद्दा राष्टÑवादीच्या सदस्य नूतन सुनील अहेर यांनी दोन दिवसांपूर्वीच ऐरणीवर आणला असताना आता एकूणच पेसातील कर्मचारी व पदाधिकाºयांच्या स्वीय सहायकांच्या नेमणुकाही अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. मंगळवारी होणाºया सर्वसाधारण सभेत राष्टÑवादीचे व भाजपाचे काही सदस्य या मुद्द्यावरून सत्ताधारी शिवसेना व कॉँग्रेसला घेरण्याच्या तयारीत असल्याचे समजते.
दोन दिवसांपूर्वीच वाखारी जिल्हा परिषद सदस्य नूतन सुनील अहेर यांनी सुरगाणा या शंभर टक्के आदिवासी तालुक्यातील एका कर्मचाºयाची मुख्यालयातील नेमणूक कोणी केली? पेसातील पदे असे प्रतिनियुक्तीने देता येतात काय? याप्रकरणी थेट पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची परवानगीच मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांच्याकडे मागितली आहे. हाच मुद्दा पकडून राष्टÑवादी व भाजपाचे काही सदस्य शिवसेना-कॉँग्रेसला कोंडीत पकडण्याची तयारी करीत आहेत. मे मध्ये झालेल्या बदल्यांमध्ये काही कर्मचाºयांना आठवड्यातून तीन दिवस मुख्यालयात काम सांभाळण्याचे लेखी आदेश मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी काढले आहेत.

Web Title: Issue of Employee Employee Dept.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.