मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविणारच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2020 11:20 PM2020-09-20T23:20:16+5:302020-09-21T01:33:47+5:30

नाशिक- मराठा समाजाच्या आरक्षणाला कोणत्याही प्रकाराचा विरोध नसल्याची पुन्हा एकदा ग्वाही देतानाच ओबींसीचे नेते तसेच राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आरक्षणासह समाजाचे अन्य प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करूच असे अश्वासन दिले आहे. गेल्या दोन दिवसांपासून मराठा क्रांती मोर्चा आणि छगन भुजबळ यांच्या भूमिकेंवरून उलट सुलट चर्चा सुरू होती. त्या पाश्वर्भूमीवर मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी (दि.२०) भुजबळ यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी हे अश्वासन दिल्याचे मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

The issue of Maratha reservation will be solved | मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविणारच

मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविणारच

Next
ठळक मुद्देछगन भुजबळ: मराठा क्रांती मोर्चाच्या नेत्यांना ग्वाही

नाशिक- मराठा समाजाच्या आरक्षणाला कोणत्याही प्रकाराचा विरोध नसल्याची पुन्हा एकदा ग्वाही देतानाच ओबींसीचे नेते तसेच राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आरक्षणासह समाजाचे अन्य प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करूच असे अश्वासन दिले आहे. गेल्या दोन दिवसांपासून मराठा क्रांती मोर्चा आणि छगन भुजबळ यांच्या भूमिकेंवरून उलट सुलट चर्चा सुरू होती. त्या पाश्वर्भूमीवर मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी (दि.२०) भुजबळ यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी हे अश्वासन दिल्याचे मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायलयाने अंतिरीम स्थगिती दिल्यानंतर समाजाच्या विविध संघटनांच्या वतीने नाशिकमध्ये आमदारांना निवेदने देण्यात आली आणि त्यानंतर छगन भुजबळ यांना निवेदन देण्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्ते गेले तेव्हा भुजबळ हे पूर्वनियोजीत कार्यक्रमासाठी त्र्यंबकेश्वर येथे गेले होते. त्यामुळे कार्यकर्त्यांनी
ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर भुजबळ न भेटल्याने त्यांच्यावर रोष व्यक्त करून कार्यकर्ते निघून गेले होते. तर भुजबळ यांनी देखील वस्तुस्थिती मांडून आपल्याविषयी राजकारण करू नये असे आवाहन केले होते. त्यानंतर
जिल्हा समन्वयक सुनील बागुल यांच्या निवासस्थानी बैठक घेण्यात आली आणि भुजबळ यांच्याशी संपर्क साधून त्यांची पुन्हा भेट घेण्याचे ठरले. त्यानुसार रविवारी (दि.२०) क्रांती मोर्चाच्या पदाधिकाºयांनी भुजबळ यांची भेट घेतली.
मी ओबीसी समाजाचा नेता आहे, हे खरे असले तरी मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी माझी पहिल्यापासून भूमिका आहे. मी माझा राष्टÑवादी पक्ष , पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि सर्व मंत्री मंडळ हे अखेरपर्यंत मराठा
आरक्षणासाठी प्रयत्न करेल अशी ग्वाही भुजबळ यांनी दिली. फुले, शाहु, आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा जपत असल्याचे सांगुन भूजबळ यांनी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी सक्रीय राहणार असल्याचे यावेळी सांगितले तर सुनील बागुल यांनी भुजबळ यांच्या संवादातून मार्ग काढण्याचे कौशल्य सांगून हीच गरज असल्याचे मान्य केले. करण गायकर यांनी पालकमंत्री भुजबळ यांच्या विषयी क्रांती मोर्चाच्या मनात आकस नाही.
शुक्रवारी (दि.१८) घडलेला प्रकार गैरसमजातून घडला. मात्र मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी भुजबळ यांनी वजन वापरावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
या बैठकीस वत्सला खैरे, राज्य समन्वयक तुषार जगताप, गणेश कदम, शरद तुंगार, शिवा तेलंग, बंटी भागवत, आशिष हिरे, चेतन शेलार, शिवाजी मोरे,संदीप शितोळे, बाळा निगळ, नीलेश शेलार, निलेश मारे, किरण पानकर, योगेश गांगुर्डे, तुषार गवळी यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

छगन भुजबळ यांनी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना अधिकारवाणीने समज दिली. तसेच समाजाच्या पाठीत खंजीर खुपसणार नाही असा शब्द दिल्याचे मोर्चाच्या पत्रकात म्हंटले आहे. समाजाच्या मुलींच्या वसतिगृहाचा प्रश्न
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून सोडविण्यात येईल. तसेच सारथी सुरू करण्यासाठी देखील प्रयत्न करू असेही भुजबळ यांनी सांगितले.
 

 

Web Title: The issue of Maratha reservation will be solved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.