निफाड ड्रायपोर्ट प्रकल्प जागेचा प्रश्न सुटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:11 AM2021-07-21T04:11:43+5:302021-07-21T04:11:43+5:30

पिंपळगाव बसवंत : निफाड कारखान्याची बोजाविरहित जमीन लवकरात लवकर जेएनपीटी हस्तांतरित करण्यात यावी. तसेच नाशिक जिल्हा बँक, निफाड ...

The issue of Nifad Dryport project site will be resolved | निफाड ड्रायपोर्ट प्रकल्प जागेचा प्रश्न सुटणार

निफाड ड्रायपोर्ट प्रकल्प जागेचा प्रश्न सुटणार

Next

पिंपळगाव बसवंत : निफाड कारखान्याची बोजाविरहित जमीन लवकरात लवकर जेएनपीटी हस्तांतरित करण्यात यावी. तसेच नाशिक जिल्हा बँक, निफाड साखर कारखाना, सहकार, महसूल, जीएसटी विभाग यांनी पुढील ७ दिवसांच्या आत संबंधित विषय मार्गी लावावा अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित अधिकारी वर्गाला दिल्याने निफाड ड्रायपोर्ट प्रकल्प जागेचा प्रश्न सुटणार आहे. या सर्वांचा पाठपुरावा व समन्वय केंद्र स्तरावर केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार व राज्यस्तरावर आमदार दिलीप बनकर करीत आहेत.

सन २०१६ मध्ये देशाचे तत्कालीन रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नाशिक येथे ड्रायपोर्ट उभारण्याची घोषणा केली. त्यांनी केलेल्या घोषणेनुसार निफाड सहकारी साखर कारखान्याकडे स्वमालकीची असलेली १०८ एकर जमीन ही नाशिक-औरंगाबाद महामार्गावर मध्य रेल्वेच्या मार्गालगत असल्याने या ठिकाणी हा प्रकल्प उभारण्याच्या दृष्टिकोनातून जागेची पाहणी करून मागणी करण्यात आली.

ही जमीन इतर ड्रायपोर्टच्या जमिनीच्या तुलनेत चांगली आहे. तसेच प्रकल्पास मान्यतादेखील देण्यात आली. निफाड साखर कारखान्याकडील थकीत रक्कम वसूल करण्याकरीता नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकरी बँकेने सरफेशी कायदा २००२ अंतर्गत या कारखान्याची मालमत्ता ताब्यात घेतलेली आहे. या कारखान्याच्या एकूण क्षेत्रापैकी काही जमीन जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट मुंबई (जेएनपीटी) या संस्थेने अधिग्रहित करण्याचे ठरवले असून त्या जमिनीचे मूल्यही निश्चित करण्यात आले आहे.

निफाड कारखान्याची बोजाविरहित जमीन लवकरात लवकर जेएनपीटी हस्तांतरित करण्यात यावी तसेच नाशिक जिल्हा बँक, निफाड साखर कारखाना, सहकार, महसूल, जीएसटी विभाग यांनी पुढील ७ दिवसांच्या आत संबंधित विषय मार्गी लावण्याच्या सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित अधिकारीवर्गाला दिल्या. याप्रसंगी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार ह्या दूरदृश्य प्रणालीव्दारे उपस्थित होत्या तर बैठकीस सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार दिलीप बनकर, अप्पर मुख्य सचिव (वित्त) मनोज सौनिक, अप्पर मुख्य सचिव (सहकार) अरविंद कुमार, राज्य कर आयुक्त राजीव मित्तल, साखर आयुक्त शेखर गायकवाड, साखर संचालक उत्तम इंदलकर, उपाध्यक्ष जेएनपीटी उन्मेष वाघ, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे प्रशासक आरिफ, मुख्य कार्यकारी संचालक पिंगळे, प्रादेशिक सहसंचालक (साखर) मिलिंद भालेराव, प्रांताधिकारी डॉ. अर्चना पटारे, कारखाना प्रशासक व बँकेचे अधिकारी उपस्थित होते.

-----------------

दुसऱ्यांदा बैठकीत तोडगा

व्याजाची रक्कम माफ झाल्यास जेएनपीटीकडून येणाऱ्या रकमेतून विक्रीकर भरणा शक्य होईल यासाठी राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात यापूर्वी बैठक पार पडली होती. परंतु हा प्रश्न प्रलंबित राहिल्याने आमदार दिलीप बनकर यांनी या प्रश्नी पुन्हा बैठक आयोजित करावी अशी मागणी पवार यांच्याकडे केली होती. त्याच अनुषंगाने सोमवार १९ जुलै २०२१ रोजी पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. बैठकीत झालेल्या चर्चेत निफाड साखर कारखान्याला विक्रीकर विभागाला सुमारे ३६:५४ कोटी मुद्दल व ३५:७२ कोटी व्याज असे एकूण ७२:२६ कोटी रुपये देणे असून या रकमेतील फक्त ४० कोटी रक्कम विक्री कर विभागाला भरावी. यामुळे कारखान्याचे सुमारे ६५ कोटी रुपये इतकी रक्कम वाचणार असून उर्वरित रक्कम नाशिक जिल्हा बँकेच्या कर्ज खात्यात जमा होणार आहे.

(२० पिंपळगाव १)

200721\20nsk_6_20072021_13.jpg

२० पिंपळगाव १

Web Title: The issue of Nifad Dryport project site will be resolved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.