नद्यांच्या प्रदूषणाचा विषयही ऐरणीवर

By admin | Published: January 23, 2015 11:41 PM2015-01-23T23:41:11+5:302015-01-23T23:41:31+5:30

अहवाल सादर करण्याचे न्यायालयाचे आदेश

The issue of pollution of rivers is also on the anvil | नद्यांच्या प्रदूषणाचा विषयही ऐरणीवर

नद्यांच्या प्रदूषणाचा विषयही ऐरणीवर

Next

नाशिक : गोदावरी नदीच्या प्रदूषणाचा विषय गाजत असतानाच आता नाशिक शहरातील अन्य नद्यांच्या प्रदूषणाचा प्रश्न उच्च न्यायालयाच्या पुढ्यात आला आहे. यासंदर्भात विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीला अहवाल देण्यास उच्च न्यायालयाने सांगितले आहे.
गोदावरी नदीच्या प्रदूषणाबाबत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली असून, त्यावर सुनावणी होत आहे. गोदावरी नदीसह अन्य नद्यांच्या प्रदूषणाबाबत उच्च न्यायालयात निरी या संस्थेने विविध शिफारशी केल्या आहेत. त्या गेल्याच सुनावणीच्या वेळी या शिफारशी सादर करण्यात आल्या आहेत. त्याबाबत न्यायमूर्ती अभय ओक आणि मेनन यांच्या समोर सुनावणी झाली. यावेळी याचिकाकर्त्यांनीही या नद्यांच्या प्रदूषणाचे छायाचित्र सादर केली. त्यामुळे न्यायमूर्तींनी हा सर्व विषय न्यायालयानेच नियुक्त केलेल्या विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीला दिला आणि त्यावर अभ्यास करून पुढील सुनावणीच्या वेळी चर्चा करण्याचे ठरविण्यात आले. राजेश पंडित, निशिकांत पगारे आणि जसबीरसिंग यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आता २० फेबु्रवारीस पुढील सुनावणी होणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The issue of pollution of rivers is also on the anvil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.