मुद्रांक विक्रेत्यांचा संप महिनाभरासाठी स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 12:49 AM2017-10-12T00:49:33+5:302017-10-12T00:49:44+5:30
नाशिक : प्रचलित मुद्रांक विक्री व्यवस्था सुरू ठेवून मुद्रांक विक्रे त्यांना दहा टक्के मनोती मिळावी यासह मुद्रांक विके्रत्यांच्या अन्य प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील सर्व मुद्रांक विके्रत्यांनी सोमवारपासून पुकारलेला संप महिनाभरासाठी स्थगित करण्यात आला आहे. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि.११) झालेल्या बैठकीत मुद्रांक विक्रेत्यांच्या मागण्या तत्त्वत: मान्य केल्या असून, नोंदणी महानिरीक्षक पुणे यांना मुद्रांक विक्रेत्यांच्या मागण्यांबाबत दोन दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्याची माहिती नाशिक मुद्रांक विक्रेता संघटनेचे अध्यक्ष सलीम काझी यांनी दिली आहे.

मुद्रांक विक्रेत्यांच्या मागण्यांविषयी अंतिम निर्णय पुढील एक महिन्यात मंत्रिमंडळ स्तरावर घेतला जाणार असल्याने महाराष्ट्र मुद्रांक विक्रेता संघटनेने एक महिन्याकरिता संप स्थगित करण्याचा निर्णय राज्यभरातील सर्व संघटनांनी घेतल्याचेही काझी यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य शासन मान्य मुद्रांक विक्रेते व दस्त लेखनिक संघटनेने सोमावारपासून त्यांच्या विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी बेमुदत संप पुकारला होता.
राज्यातील प्रचलित छापील मुद्रांक विक्री व्यवस्थेत कोणताही बदल न करता विक्रे त्यांना दहा टक्के मनोती मिळावी, राज्यात सुरू असलेली ई-चलन तसेच ई एसबीआरटी ही प्रणाली अधिकृत मुद्रांक विक्रेते व दस्तलेखक यांच्यामार्फतच राबवण्यात यावी, एसपी प्रणाली विनाअट अधिकृत मुद्रांक विक्रेते व दस्तलेखक यांनाच परवाना मिळावा अशी मागणी करण्यात आली होती.मागण्यांचा विचारमयत मुद्रांक विक्रेत्यांच्या मुलांना वारसा हक्कानेच परवाना मिळावा या मागण्यांसाठी राज्यभरातील मुद्रांक विक्रेत्यांनी संप पुकारला होता. परंतु बुधवारी महसूल मंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीत शासनाने मुद्रांक विक्रेत्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक विचार केल्याने महिनाभरासाठी राज्यभरातील मुद्रांक विक्रे त्यांनी राज्यव्यापी संप मागे घेतला आहे.