रस्त्यावरील भाजीबाजार स्थलांतराचा प्रश्न कायम

By admin | Published: June 3, 2017 12:17 AM2017-06-03T00:17:56+5:302017-06-03T00:18:08+5:30

सातपूर : रस्त्याच्या कडेला अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्या भाजीविक्रेत्यांना स्थलांतरित करण्यासाठी मनपाकडून पूर्व तयारी करण्यात आली होती

The issue of vegetable market migrations on the road continues | रस्त्यावरील भाजीबाजार स्थलांतराचा प्रश्न कायम

रस्त्यावरील भाजीबाजार स्थलांतराचा प्रश्न कायम

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
सातपूर : सातपूर गावातील रस्त्याच्या कडेला अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्या भाजीविक्रेत्यांना मंडईत स्थलांतरित करण्यासाठी मनपाकडून पूर्व तयारी करण्यात आली होती. त्यासाठी जागेची मोजणी करून आखणीदेखील केली होती. मात्र प्रत्यक्षात अंमलबजावणी का झाली नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
श्री छत्रपती शिवाजी महाराज मंडईतील भाजीविक्रे त्यांनीच पुढाकार घेऊन मनपा विभागीय अधिकारी राजेंद्र गोसावी यांची भेट घेऊन रस्त्यावरील भाजीविक्रे त्यांचे अतिक्र मण हटविण्याची मागणी केली होती. या विक्रे त्यांना मंडईत असलेल्या जागेवर कायमस्वरूपी स्थलांतरित करण्यात यावे आणि रस्ता कायमस्वरूपी मोकळा करावा. सणासाठी बसणाऱ्या विक्रेत्यांनादेखील मंडईत बसविण्यात यावे, पार्किंगची सोय करावी, मंडईतील शौचालयाची नियमित साफसफाई करावी, पाण्याची सोय करावी, यांसह विविध मागण्या करण्यात आल्या होत्या.
या मागणीची दखल घेत विभागीय अधिकारी राजेंद्र गोसावी यांनी मनपा कर्मचाऱ्यांना निर्देशित केले होते. त्यानुसार या कर्मचाऱ्यांनी मंडईतील अतिरिक्त जागेची मोजणी करून जागेची आखणीदेखील केली होती. आखणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना भाजीविक्रेता व्यावसायिकांकडून सहकार्य केले होते.
यानंतर खूप दिवसांचा कालावधी लोटला आहे. महापालिकेच्या निवडणुका झाल्या आहेत. आता तरी विभागीय अधिकाऱ्यांनी लक्ष घालून हा वाद मिटवावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Web Title: The issue of vegetable market migrations on the road continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.