भाडेकरूंच्या पार्श्वभूमीचा मुद्दा ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 12:30 AM2017-10-25T00:30:09+5:302017-10-25T00:30:09+5:30

परिसरातील जीएसटी भवनजवळ अहमदनगर येथील सराईत गुंड पकडल्यानंतर भाडेकरूंच्या पार्श्वभूमीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात भाड्याने घरे देण्यात आली असून, आता संबंधितांची पार्श्वभूमी किमान भाडेकरूंची नावे व अन्य माहिती तपासणी करणे गरजेचे झाले आहे.

Issues of Tenants' Issues on Anecdotes | भाडेकरूंच्या पार्श्वभूमीचा मुद्दा ऐरणीवर

भाडेकरूंच्या पार्श्वभूमीचा मुद्दा ऐरणीवर

Next

पाथर्डी फाटा : परिसरातील जीएसटी भवनजवळ अहमदनगर येथील सराईत गुंड पकडल्यानंतर भाडेकरूंच्या पार्श्वभूमीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात भाड्याने घरे देण्यात आली असून, आता संबंधितांची पार्श्वभूमी किमान भाडेकरूंची नावे व अन्य माहिती तपासणी करणे गरजेचे झाले आहे.  गेल्या दीड दशकात पाथर्डी फाटा हा शहरातील सर्वांत वेगाने व मोठ्या प्रमाणात विकसित व विस्तारित झालेला भाग आहे. शहराच्या सीमेवरच्या या भागात नाशिककरांसह मुंबई, पुणे व इतर ठिकाणच्या लोकांनी स्थावर गुंतवणूक म्हणून घर घेऊन ठेवलेली आहेत. परिसरात वास्तव्यास असलेल्यांचीही एक दोन घर अधिकची घेऊन ठेवून ती भाड्याने देण्याची प्रथा सुरू केली आहे. अशा घरांमध्ये मालकांऐवजी भाडेकरू जास्त प्रमाणात राहत असल्याचे चित्र आहे. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर व सिन्नर तालुक्यात वेगवेगळ्या खात्यांमध्ये नोकरी करणारे तसेच अंबड, गोंदे, वाडीवºहे आदी ठिकाणच्या औद्योगिक वसाहतींमध्ये कामासाठी जाणाºयांची मोठी संख्या पाथर्डी फाटा परिसरात वास्तव्यास आहे. घर भाड्याने देण्याचा व्यवसाय करणारे संबंधित एजंट किंवा घरमालक या भाडेकरूंची कोणतीही माहिती पोलिसांना कळवत नाहीत.
वास्तविक भाडेकरूची माहिती पोलिसांना देताना घरमालकाचे कोणतेही नुकसान होत नाही. उलट भाडेकराराची अंमलबजावणी होणेही सोयीचे होईल. तरीही माहिती दिली जात नाही. मनपाला माहिती दिली जात नाही, कारण मग मनपा प्रशासन व्यावसायिक दराने घरपट्टीची आकारणी करते. त्यामुळे भाडेकरूंविषयीची माहिती दडवली जाते. परंतु त्यातून गुंड प्रवृत्तीचे लोक गैरफायदा घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Web Title: Issues of Tenants' Issues on Anecdotes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.