त्यांच्यासाठी बुडत्या नौकेत बसणे घातकच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:11 AM2021-01-09T04:11:59+5:302021-01-09T04:11:59+5:30
बागुल आणि गीते यांना पक्षाने सन्मानाची वागणूक दिली. दोघांना प्रदेश उपाध्यक्षपद दिले, तसेच दोघांच्या घरी उपमहापौरपद दिले. गीते यांना ...
बागुल आणि गीते यांना पक्षाने सन्मानाची वागणूक दिली. दोघांना प्रदेश उपाध्यक्षपद दिले, तसेच दोघांच्या घरी उपमहापौरपद दिले. गीते यांना महानगर प्रभारीही नेमले होते. मात्र, त्यानंतरही त्यांची व्यक्तिगत महत्त्वाकांक्षा मोठी असू शकते, असे सांगून सावजी म्हणाले की, पक्षातील केाणत्याही व्यक्तीविषयी काही अडचणी असेल, तर पक्षाचे व्यासपीठ हेाते, परंतु त्यासाठी पक्षांतर हा मार्ग नव्हता. त्यातही ज्या शिवसेनेत आणि ज्यांच्या भरवशावर ते गेले, त्यांची अवस्था बिकट आहे. शिवसेनेला नाशकात जनाधार नाही आणि खासदार संजय राऊत यांच्या कुटुंबीयांची तर इडीमार्फत चौकशी सुरू आहे. अशा वेळी त्यांच्या भरवशावर शिवसेनेत जाऊन राजकारण करणे कितपत सोयीचे, याबाबत काळच उत्तर देईल, असे ते म्हणाले.
भाजपचे शहराध्यक्ष गिरीश पालवे यांनीही गीते-बागुल यांच्या पक्षांतराबद्दल खेद व्यक्त केला आहे. अर्थात, या देाघांच्या जाण्यामुळे पक्षाच्या ताकदीवर परिणाम होणार नाही, कारण हा कार्यकर्त्यांवर चालणारा पक्ष आहे, असे त्यांनी नमूद केले आहे. दोन्ही नेत्यांना पक्षाने भरपूर दिले, आता त्यांच्या कुटुबांयीना पदे दिली. कोअर कमिटीत सहभागी करून घेऊन निर्णय प्रक्रियेत सामावून घेतले. त्यानंतरही त्यांना काही वाटत असेल, तर पक्षाच्या नेत्यांकडे ते दाद मागू शकले असते, परंतु तसे न करता, पक्ष सेाडणे हे खेदजनक असल्याचे पालवेे यांनी नमूद केले आहे.