प्रत्येक दहा मिनिटांनी घडतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 01:05 AM2018-09-21T01:05:14+5:302018-09-21T01:05:37+5:30

नाशिक : सायबर गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, २०१० मध्ये असे ९६६ गुन्हे दाखल होते. ही सख्या २०१६ मध्ये वाढून थेट १२ हजार ३१७ पर्यंत जाऊन ठेपली आहे. त्यात दिवसेंदिवस वाढ होत असून, सध्याच्या स्थितीत दर १० मिनिटांनी एक सायबर गुन्हा घडतो. दुर्दैवाची बाब म्हणजे या संशयितांमध्ये प्रामुख्याने शाळकरी मुले, महाविद्यालयीन विद्यार्थी यांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे प्रतिपादन सायबर सुरक्षा तज्ज्ञ रक्षित टंडन यांनी केले.

It happens every ten minutes | प्रत्येक दहा मिनिटांनी घडतो

प्रत्येक दहा मिनिटांनी घडतो

Next
ठळक मुद्देएक सायबर गुन्हा : रक्षित टंडन

नाशिक : सायबर गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, २०१० मध्ये असे ९६६ गुन्हे दाखल होते. ही सख्या २०१६ मध्ये वाढून थेट १२ हजार ३१७ पर्यंत जाऊन ठेपली आहे. त्यात दिवसेंदिवस वाढ होत असून, सध्याच्या स्थितीत दर १० मिनिटांनी एक सायबर गुन्हा घडतो. दुर्दैवाची बाब म्हणजे या संशयितांमध्ये प्रामुख्याने शाळकरी मुले, महाविद्यालयीन विद्यार्थी यांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे प्रतिपादन सायबर सुरक्षा तज्ज्ञ रक्षित टंडन यांनी केले.
डॉ. वसंत पवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गोदावरी बँकेतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर बँकेच्या माजी अध्यक्ष तथा मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार, अध्यक्ष अमृता पवार, उपाध्यक्ष राजाराम बस्ते, कार्यकारी संचालक प्रणव पवार, संचालक वसंत खैरनार उपस्थित होते. रक्षित टंडन म्हणाले, घरातील मुलांना मोबाइलचा वापर करताना पालकांनी त्यावर निर्बंध ठेवावेत. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपला व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक अशा विविध सोशल मीडियावर सक्रिय सहभाग असतो. बरीच खासगी माहिती सोशल मीडियावर जाहीर केली जाते. त्यामुळे या माध्यमांचा वापर करताना सिक्युरिटी व प्रायव्हसी सेटिंग्जकडे दुर्लक्ष करता कामा नये, असे ही त्यांनी आवर्जुन सांगितले. यावेळी योगेश हिरे, डॉ. तानाजी कानडे, सुप्रिया नाथे, अ‍ॅड. दत्तात्रय पिंगळे, बाळासाहेब तांबे, रवींद्र मणियार, मोतीराम कुशारे, दौलत बोडके आदी उपस्थित होते.

Web Title: It happens every ten minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.