गावी जाण्यासाठी मजुरांना तहसीलदारांकडे नोंदणी बंधनकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 09:26 PM2020-05-21T21:26:47+5:302020-05-21T23:29:04+5:30
नाशिक : जिल्ह्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या परप्रांतीय मजुरांना त्यांच्या गावी जायचे असल्यास त्यांना आपल्या तालुक्यातील तहसीलदारांकडे आॅनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे. मनपा हद्दीतील परप्रांतीय प्रवासी वगळून सदर सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांनी दिली.
नाशिक : जिल्ह्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या परप्रांतीय मजुरांना त्यांच्या गावी जायचे असल्यास
त्यांना आपल्या तालुक्यातील तहसीलदारांकडे आॅनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे. मनपा हद्दीतील परप्रांतीय प्रवासी वगळून सदर सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांनी दिली.
नाशिक मनपा आणि मालेगाव मनपा हद्द वगळून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील परप्रांतीय नागरिकांना त्यांच्या गावी जाण्यासाठी त्यांना त्या-त्या तालुक्यांचे तहसीलदारांकडे आॅनलाइन अर्ज करणे बंधनकारक आहे. राज्य शासनाकडून परप्रांतीय नागरिकांना त्यांच्या गावी पोहोचविण्यासाठी विशेष रेल्वेची सुविधा उपलब्ध करून दिली असल्याने नावनोंदणी केलेल्या परराज्यातील नागरिकांनाच या विशेष सुविधेचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे त्यांनी तहसीलदारांकडे नोंदणी करणे अपेक्षित आहे, असे आवाहन मुंडावरे यांनी केले आहे.
आतापर्यंत रेल्वे आणि बसेसच्या माध्यमातून परप्रांतीय नागरिकांना आपल्या राज्यातील सीमारेषेपर्यंत सोडण्यात आलेले आहे. जिल्ह्यात विविध तालुक्यांत अजूनही अनेक परप्रांतीयांनी गावी जाण्याची इच्छा व्यक्त केली असून, त्यांनी नावे नोंदणीला सुरुवातही केलेली आहे. ज्यांची अजूनही नोंदणी झालेली नाही त्यांनी आपल्या तालुक्यातच नोंदणी करण्यासाठी तहसीलदारांशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
नोंदणी झालेल्या आणि ज्यांच्यासाठी रेल्वे उपलब्ध झाली आहे अशा तालुक्यांतून परप्रांतीय प्रवाशांना बसेसच्या माध्यमातून नाशिकरोड रेल्वेस्थानकावर पोहोचविले जाते.
----------------------------------
एसएमएसद्वारे माहिती
सदर संपूर्ण प्रक्रिया ही ग्रामीण भागात वास्तव्यास असलेल्या आणि आता आपल्या गावी जाऊ इच्छिणाºया परप्रांतीय प्रवाशांसाठी असून त्यांनी सदर प्रक्रिया जाणून घेऊन तहसीलदारांकडे आपल्या नावाची आॅनलाइन नोंदणी करणे अपेक्षित आहे. नोंदणी झालेल्यांना त्यांच्या परतीची व्यवस्था झाल्यानंतर त्यांना त्याची माहिती भ्रमणध्वनीवरून एसएमएसद्वारे दिली जाते. ज्यादिवशी रेल्वे उपलब्ध होईल, त्यानुसार त्यांना बसद्वारे स्टेशनवर आणि तेथून विशेष रेल्वेने आपल्या राज्यात परत जाण्याची सुविधा दिली जात आहे.