जीवनात परिश्रमांसोबत वेळेची सांगड घालणे आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 12:57 AM2018-02-25T00:57:11+5:302018-02-25T00:57:11+5:30
आपल्या आयुष्यात ध्येय निश्चित केले पाहिजे. तसेच निश्चित केलेल्या ध्येयप्राप्तीसाठी नियोजन करून येणाºया संकटांवर यशस्वीपणे मात करण्यासाठी कठीण परिश्रम आणि वेळेची सांगड घालण्याचा मंत्र ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांनी विद्यार्थ्यांना दिला आहे.
नाशिक : आपल्या आयुष्यात ध्येय निश्चित केले पाहिजे. तसेच निश्चित केलेल्या ध्येयप्राप्तीसाठी नियोजन करून येणाºया संकटांवर यशस्वीपणे मात करण्यासाठी कठीण परिश्रम आणि वेळेची सांगड घालण्याचा मंत्र ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांनी विद्यार्थ्यांना दिला आहे. दैनंदिन काम करताना अडचणी येतातच परंतु, त्याला न डगमगता सदैव सैनिकांप्रमाणे सामोरे जाण्याचा सल्लाही त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला. अशोका युनिव्हर्सल स्कूलतर्फे सिटी सेंटर मॉल येथे आयोजित कलामहोत्सवाचे उद्घाटन ज्येष्ठ समाजसेविका तथा अनाथांच्या माई सिंधूताई सपकाळ यांच्या हस्ते शनिवारी (दि.२४) झाले. यावेळी अशोका ग्रुपचे चेअरमन अशोक कटारिया, स्कूलचे सहसचिव श्रीकांत शुक्ला, अस्था कटारिया, श्वेता मोदी आदी उपस्थित होते. अशोका ज्युनिअर कॉलेज, अशोका कॉलेज आॅफ एज्युकेशनच्या विद्यार्थ्यांना या कलामहोत्सवाच्या निमित्ताने सपकाळ यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली. या कलामहोत्सवात घेण्यात आलेल्या मुलाखतीस त्यांनी दिलखुलास उत्तरे दिली.
वैविध्यपूर्ण कलाकृती
लाकडावरील कलाकुसर, कॅलिग्राफीतील वैविध्यता, चित्रांतून साकारलेल्या थक्क करणाºया कलाकृती, म्युरलचे आधुनिक रूप साकारण्याचा प्रयत्न अशोका युनिव्हर्सल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अशोका कलामहोत्सवात केला. यात अशोका युनिव्हर्सल स्कूलच्या वडाळा, चांदसी, सिन्नर, अशोका ग्लोबल अकॅडमी, अर्जुननगर आणि अशोका ग्लोबल प्रि-स्कूल आदी शाखांमधील विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचा समावेश आहे. सिंधूताई सपकाळ यांच्या सन्मती बाल निकेतनच्या मदतीसाठी यंदाच्या दोनदिवसीय कलामहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.