भारतीय संस्कृती समजण्यासाठी संस्कृत शिकणे आवश्यक- हुन्नरगीकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:18 AM2021-08-24T04:18:54+5:302021-08-24T04:18:54+5:30
भारताची संस्कृती जाणून घेण्यासाठीच मुघल आणि ब्रिटिशांनी संस्कृत भाषा आत्मसात केली होती. वास्तु,कला, विज्ञान, गणित या सगळ्या विषयांचे ...
भारताची संस्कृती जाणून घेण्यासाठीच मुघल आणि ब्रिटिशांनी संस्कृत भाषा आत्मसात केली होती. वास्तु,कला, विज्ञान, गणित या सगळ्या विषयांचे आद्य ग्रंथ आणि संस्कृतमधूनच लिहिले गेले. संस्कृतीमुळे साहित्याची उंची वाढते, उच्चार स्पष्ट होतात, स्मरणशक्ती वाढते, असे हुन्नरगीकर यांनी सांगितले. विनय जोशी यांनी संस्कृत भाषेची उत्पत्ती, संस्कृत भाषेचे महत्त्व, आदिमानव मानवापासून संस्कृत भाषा अस्तित्वात आहे. पारंपरिक संस्कृती, ग्रंथ व त्यांचे महत्त्व त्यांनी सांगितले. प्रास्ताविकात संस्कृत शिक्षिका स्मिता जोशी यांनी संस्कृत दिनाचे महत्त्व सांगितले. प्राचार्य साक्षी भालेराव यांनी मनोगत व्यक्त केले.
सूत्रसंचालन प्रज्ञा डोंगरदिवे यांनी केले. यावेळी सहकार्यवाहक दिलीप बेलगावकर, कार्यवाह हेमंत देशपांडे, शाळेचे पालक मिलिंद वैद्य, शाळेच्या चेअरमन वसुधा कुलकर्णी, कमांडंट एम. एम. मसूर उपस्थित होते.