शस्त्रक्रियेनंतरही योगाभ्यासाने शरीराची कार्यक्षमता वाढविणे शक्य : पल्लवी सामंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:31 AM2020-12-16T04:31:36+5:302020-12-16T04:31:36+5:30
भोसला मिलिटरी स्कूल गर्ल्स नाशिक येथे ‘कळी उमलताना’ ऑनलाइन व्याख्यानमालेतील तिसऱ्या सत्रात सोमवारी त्यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना फिजिओथेरपीचे महत्त्व ...
भोसला मिलिटरी स्कूल गर्ल्स नाशिक येथे ‘कळी उमलताना’ ऑनलाइन व्याख्यानमालेतील तिसऱ्या सत्रात सोमवारी त्यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना फिजिओथेरपीचे महत्त्व पटवून सांगितले. योगातील कर्म, ज्ञान, भक्ती यामुळे मानसिकतेवर येणारा ताणतणाव दूर करून स्वतःला सक्षम बनविणे व त्याचबरोबर फिजिओथेरपीमध्ये विविध आसनांचा उपयोग करून आजार व रोगांवर मात करू शकतो, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, विद्यार्थिनींसोबतच त्यांच्या माता-पालक व शिक्षिकांच्या विविध शंकांचेही त्यांनी यावेळी निरसन केले. यावेळी शाळेचे पालक मिलिंद वैद्य, शाळेच्या अध्यक्ष वसुधा कुलकर्णी, मेजर शैलजा रकिबे, डॉ. अंजली सक्सेना आदी उपस्थित होते. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थिनी व पालकांनीही या व्याख्यानमालेत सहभाग नोंदवला होता. सूत्रसंचालन स्वाती मुळे यांनी केले.