अद्ययावत तंत्रज्ञानाद्वारे कर्करोगावर मात शक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 12:27 AM2018-08-12T00:27:01+5:302018-08-12T00:29:18+5:30
भारतात स्त्रियांमध्ये सर्वाधिक आढळणाऱ्या स्तनाच्या कर्करोगाचे पहिल्या टप्प्यावरच निदान होणे आता सहज शक्य आहे. जेनेटिक तपासण्या आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात आल्या आहेत. जगभरात विविध रोगांवर होणाºया संशोधनापैकी २५ टक्केपेक्षा अधिक संशोधन केवळ कर्करोगावर होत आहे, त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञान अन् संशोधनामुळे कर्करोगावर मात करणे सहज शक्य असल्याचा सूर राज्यस्तरीय चौथ्या अॅँमो परिषदेत उमटला.
नाशिक : भारतात स्त्रियांमध्ये सर्वाधिक आढळणाऱ्या स्तनाच्या कर्करोगाचे पहिल्या टप्प्यावरच निदान होणे आता सहज शक्य आहे. जेनेटिक तपासण्या आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात आल्या आहेत. जगभरात विविध रोगांवर होणाºया संशोधनापैकी २५ टक्केपेक्षा अधिक संशोधन केवळ कर्करोगावर होत आहे, त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञान अन् संशोधनामुळे कर्करोगावर मात करणे सहज शक्य असल्याचा सूर राज्यस्तरीय चौथ्या अॅँमो परिषदेत उमटला.
शहरात दोनदिवसीय चौथ्या राज्यस्तरीय अँमो परिषदेला शनिवारी (दि.११) प्रारंभ करण्यात आला. मेडिकल आँकॉलॉजीमधील अद्ययावत तंत्रज्ञानाची माहिती राज्यभरातील क र्करोगतज्ज्ञांना व्हावी, या उद्देशाने असोसिएशन आॅफ महाराष्ट्र मेडिकल आँकॉलॉजीस्टच्या वतीने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी परिषदेचा समारोप होणार आहे. या परिषदेसाठी नाशिक विभागासह राज्यभरातून कर्करोग तज्ज्ञ सहभागी झाले आहेत. उद्घाटनाप्रसंगी डॉ. पूर्वेश पारीख, डॉ. गोविंद बाबू, डॉ. शैलेश बोंदार्डे, डॉ. चंद्रशेखर पेठे आदी उपस्थित होते.
केमोथेरपी करताना रु ग्णांना होणारा त्रास ८० टक्के कमी करण्यास वैद्यकशास्त्राला यश आले आहे. त्यामुळे कर्करोग रु ग्ण पूर्ण कोर्स करून आता सामान्य आयुष्यही जगत असल्याचे डॉ. शैलेंद्र बोंदार्डे यांनी सांगितले.
दरम्यान, स्तनाच्या कर्करोगावर परिसंवाद, विविध प्रकारच्या हार्मोनल स्तन कर्करोगावर मार्गदर्शन, फुफ्फुसाचा कर्करोग व व्यवस्थापन, उपचारांमधील क्रमवारी, प्रोस्टेट कॅन्सरमध्ये योग्य रु ग्णावर योग्य वेळी उपचार, किडनी कॅन्सरमधील टीकेआय थेरपी अशा विविध विषयांवर यावेळी मंथन घडून आले.
जगण्याची शाश्वती २५ टक्क्यांनी वाढली
स्तनाच्या कर्करोगासाठी स्क्र ीनिंग, कर्करोगाचा धोका वेळीच ओळखण्यासाठीचे तंत्रज्ञान यावर परिषदेत चर्चा करण्यात आली. यावेळी स्तनाच्या कर्करोगाच्या अवघड प्रकरणामध्ये शेवटच्या टप्प्यातील कर्करोगावर उपचार करताना रु ग्ण जगण्याची शाश्वती पूर्वीपेक्षा २५ टक्क्यांनी वाढली असल्याचे यावेळी तज्ज्ञांनी सांगितले.