पावसाला सुरुवात अन् रस्ता पुन्हा बनला निसरडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:18 AM2021-08-22T04:18:12+5:302021-08-22T04:18:12+5:30
नवीन आडगाव नाक्यावरून द्वारकाकडे उड्डाण पुलाखालून मुख्य रस्त्याने जाणाऱ्या सर्व वाहनांना स्वामी नारायण पोलीस चौकी जवळच्या समांतर रस्त्याने तपोवन ...
नवीन आडगाव नाक्यावरून द्वारकाकडे उड्डाण पुलाखालून मुख्य रस्त्याने जाणाऱ्या सर्व वाहनांना स्वामी नारायण पोलीस चौकी जवळच्या समांतर रस्त्याने तपोवन क्रॉसिंगपर्यंत जावे लागते त्यानंतर पुढे कन्नमवार पुलाकडे, तर पंचवटीत निमाणी बाजूला जाणाऱ्या वाहनांना तपोवन क्रॉसिंगकडून वळण घ्यावे लागत आहे. शनिवारी दुपारी पाऊस सुरू होताच वाहतूक शाखेने खबरदारी म्हणून रस्ता बंद केला असला तरी या रस्त्यावरून वारंवार दुचाकी घसरून अपघात होत असल्याने त्यावर उपाययोजना करावी असे पत्र वाहतूक शाखेने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण
यांना दिले. मात्र, त्यांच्याकडून दखल घेतली जात नाही, असे पोलिसांनी सांगितले.
--इन्फो---
द्वारका ते कन्नमवार पुलापर्यंत अपघात अधिक
द्वारका चौकातून थेट कन्नमवार पुलापर्यंत महामार्गाने जाताना दुचाकीस्वार घसरून अपघात होण्याच्या घटनांमध्ये शनिवारी अधिकच वाढ झाल्याचे दिसून आले. मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग असूनदेखील तो सुरक्षित करण्यास महामार्ग प्राधिकरण मागील पंधरवड्यापासून अपयशी ठरत असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. वाहनचालक उदासीनतेची बळी ठरल्यानंतर प्रशासनाला जाग येणार का? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.
---
210821\21nsk_61_21082021_13.jpg~210821\21nsk_62_21082021_13.jpg
रस्त्यावर अपघात~रस्त्यावर अपघात