जिल्ह्यातील पोल्ट्रीसाठी महिन्याला लागते १० हजार टन सोया ढेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:17 AM2021-09-23T04:17:15+5:302021-09-23T04:17:15+5:30
गतवर्षी नैसर्गिक आपत्ती, बोगस बियाणे आदी विविध कारणांमुळे सोयाबीनचे उत्पादन कमी झाले होते. याशिवाय परदेशातही सोयाबीन उत्पादनावर परिणाम झाल्यामुळे ...
गतवर्षी नैसर्गिक आपत्ती, बोगस बियाणे आदी विविध कारणांमुळे सोयाबीनचे उत्पादन कमी झाले होते. याशिवाय परदेशातही सोयाबीन उत्पादनावर परिणाम झाल्यामुळे जिल्ह्यात साेयाबीन ढेपेची टंचाई निर्माण झाली आहे. यापूर्वी ढेप मुबलक प्रमाणात मिळत होती. यावर्षी मात्र कधी नव्हे ती टंचाई निर्माण झाल्याने अनेक पोल्ट्री व्यावसायिक अडचणीत आले आहेत. यामुळे अनेकांनी उत्पादन कमी केले आहे. केंद्र सरकारने सोयाबीन ढेप आयातीचा निर्णय घेतला असून सुरुवातीला त्याची मुदत ३० ऑक्टोबरपर्यंत होती. ती आता ३१ डिसेंबरपर्यंत करण्यात आली आहे. तोपर्यंत आपल्याकडील सोयाबीन येण्यास सुरुवात होणार आहे. यामुळे यावर्षी सोयाबीनच्या दरावर परिणाम होऊन ते खाली येण्याची शक्यता आहे. दरम्यान नवीन माल निघाल्यानंतर शेतकऱ्यांनी लगेचच ते विकण्याची घाई करु नये असा सल्ला कृषी तज्ज्ञांकडून दिला जात आहे.
कोट-
यावर्षी सोयाबीनचे दर पाच हजार रुपये प्रति क्विंटलच्या पुढेच राहाण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावर्षी पेरा अधिक झाला असल्याचे सांगितले जात असले तरी काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे नुकसानही झाले आहे. परदेशातील माल यायला
उशीर होत असल्याने सोयाबीनला चांगला दर राहाण्याची अपेक्षा आहे. - उद्धव अहिरे, पोल्ट्री व्यावसायिक