स्थगितीनंतरही अवैध उत्खनन सुरू असल्याचे उघडकीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:10 AM2021-06-30T04:10:00+5:302021-06-30T04:10:00+5:30

ब्रह्मगिरी कृती समितीतर्फे आयोजित कार्यक्रमात हॅशटॅग चिपको, उत्तुंग झेप फाउंडेशनच्या सुमारे ५० कार्यकर्त्यांनी रविवारी भांगडी व संतोषा डोंगर परिसरातील ...

It was revealed that illegal excavations were going on even after the suspension | स्थगितीनंतरही अवैध उत्खनन सुरू असल्याचे उघडकीस

स्थगितीनंतरही अवैध उत्खनन सुरू असल्याचे उघडकीस

Next

ब्रह्मगिरी कृती समितीतर्फे आयोजित कार्यक्रमात हॅशटॅग चिपको, उत्तुंग झेप फाउंडेशनच्या सुमारे ५० कार्यकर्त्यांनी रविवारी भांगडी व संतोषा डोंगर परिसरातील अवैध उत्खनन परिस्थितीची पहाणी केली. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी पर्यावरण संरक्षण कृतीदलाला भांगडी व संतोषा डोंगरावरील उत्खननाला तात्पुरती स्थगिती दिल्याचे पत्र दिले असताना या आदेशाला धाब्यावर बसवून राजरोसपणे उत्खनन सुरु असल्याचे दिसून आले. बेलगावढगा येथील शेतकरी दत्तू ढगे यांनी २०१४ पासून या भागातील उत्खननाला वेग आला असल्याची तक्रार केली तसेच २०१६ पासून शासन - प्रशासनाशी पत्रव्यवहार करूनही पाच वर्षांत अद्याप एकही उत्तर मिळाले नसल्याचे त्यांनी सांगितले. तर चळवळीचे प्रमुख रोहन देशपांडे यांनी पर्यावरणप्रेमींनी जागरूक राहण्याची गरज व्यक्त केली. वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष शांताराम महाराज दुसाने म्हणाले, ब्रह्मगिरी बचावासाठी आम्ही आंदोलन केले. पण कोरोनाचे कारण पुढे करून आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला. पर्यावरणतज्ज्ञ प्रशांत परदेशी, प्रकाश निकम यांनी, उभा डोंगर कापण्याचे धैर्य संबंधितांना कुठून येते ? खाण खोदकामासाठी जिलेटीन कुठून मिळवले जाते? याचाही कसून तपास व्हायला पाहिजे अशी मागणी केली.

चौकट=====

प्रशासनाने उत्खनन बंद पाडले

दरम्यान, प्रांत अधिकारी वर्षा मीना यांनी घटनास्थळी दाखल होत दोन जेसीबी ताब्यात घेतले. पंचनामा करून ते नजीकच्या पोलीस ठाण्यात पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तेथे होणारे अवैध उत्खनन बंद केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. हॅशटॅग चिपको नाशिकतर्फे लवकरच पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना ब्रह्मगिरी, भांगडी व संतोषा परिसरात पहाणी दौरा करण्याचे निमंत्रण देण्यात येणार आहे.

(फोटो २८ डोंगर)

Web Title: It was revealed that illegal excavations were going on even after the suspension

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.