जाने कहॉ गये वो दिन...

By admin | Published: November 14, 2016 12:48 AM2016-11-14T00:48:55+5:302016-11-14T00:48:20+5:30

‘अ‍ॅन इव्हिनिंग इन नाशिक’ मैफल

It was said that the day ... | जाने कहॉ गये वो दिन...

जाने कहॉ गये वो दिन...

Next

नाशिक : अजी ऐसा मौका फिर कहाँ मिलेगा, आवारा हुँ, अजीब दासता है ये, तेरा मेरा प्यार अमर... या आणि अशा शंकर- जयकिशन यांनी संगीतबध्द केलेल्या गीतांचे सादरीकरण रविवारी (दि. १३) ‘अ‍ॅन इव्हिनिंग इन नाशिक’ या कार्यक्रमात सादर करण्यात आले. हरिहर भेट महोत्सवांतर्गत रविवार पेठ येथील श्री सुंदर नारायण मित्रमंडळ ट्रस्ट यांच्यातर्फे या कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले.
‘अ‍ॅन इव्हिनिंग इन नाशिक’ या कार्यक्रमात राजेश परदेशी, सुनील आव्हाड, रिटा डिसूझा आणि रेणुका बायस यांनी आपल्या सुरेल आवाजांनी रसिकांची मने जिंकली. या कार्यक्रमात जाने कहॉ गये वो दिन, सजन रे झुठ मत बोलो, बदन पे सितारे, प्यार हुआ इकरार हुआ, आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जबान पर... या गीतांनी रसिकांची मने जिंकली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला अविनाश जाधव यांनी शंकर- जयकिशन यांनी रचलेल्या विविध रचना सेक्सोफोन वाद्यातून रसिकांना ऐकवल्या. शंकर- जयकिशन नाईट या कार्यक्रमात गीतांनी जशी रंगत आणली त्याचप्रकारे उस्मान पटणी यांनी केलेल्या खुमासदार निवेदनामुळे आणि विविध टप्प्यांवर पेश केलेल्या गजलमुळे प्रेक्षकांना अक्षरश: खिळवून ठेवले. हरिहर भेट महोत्सवांतर्गत सोमवारी (दि. १४) संध्याकाळी श्रीहरी भजनी मंडळाची भजन सेवा आणि संमोहन तज्ज्ञ डॉ. शैलेंद्र गायकवाड यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असून, भाविकांनी कार्यक्रमाचा आस्वाद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: It was said that the day ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.