राष्ट्रवादी एक संघ आहे की फाटा फूट लवकरच कळेल; गिरीश महाजनांचे सूतोवाच

By संजय पाठक | Published: August 15, 2023 12:19 PM2023-08-15T12:19:07+5:302023-08-15T12:19:18+5:30

 गिरीश महाजन यांच्या हस्ते आज नाशिक मध्ये स्वातंत्र्य दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा पार पडला त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केलं.

It will soon be known whether the ncp are a union or a rift; Girish Mahajan's statement in nashik | राष्ट्रवादी एक संघ आहे की फाटा फूट लवकरच कळेल; गिरीश महाजनांचे सूतोवाच

राष्ट्रवादी एक संघ आहे की फाटा फूट लवकरच कळेल; गिरीश महाजनांचे सूतोवाच

googlenewsNext

नाशिक- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एक गट सत्तारूढ सेना -भाजपा बरोबर आहे मात्र सध्या राष्ट्रवादीत फूट आहे की हे संमतीचे राजकारण सुरू आहे याबाबत संभ्रम आहे. त्यावर भाष्य करताना भाजपाचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी हा संभ्रम लवकरच दूर होईल असं म्हटलं आहे.

 गिरीश महाजन यांच्या हस्ते आज नाशिक मध्ये स्वातंत्र्य दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा पार पडला त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केलं.

राजकारणात काय होईल ते सांगता येत नाही, अजितदादा पवार आणि छगन भुजबळ तसेच दिलीप वळसे पाटील हे भाजपा बरोबर येतील असं वाटलं होतं का असा प्रश्न जयंत पाटील यांच्या भाजपाच्या पक्षप्रवेश बाबत बोलताना त्यांनी केला. सध्या सत्तारूढ पक्षांमध्ये खाते वाटपावरून रस्सीखेच सुरू असली तरी कोणाला कोणतं खातं द्यायचं हे नेते ठरवतील आणि सर्व संमतीने यावर निर्णय होईल. यावरून सध्या सरकारमध्ये कोणतेही ताणतणाव नसल्याचे गिरीश महाजन म्हणाले.

ध्वजारोहणासाठी मंत्र्यांना वेगवेगळे जिल्हे देण्यात आले आहे त्यामुळे पालकमंत्री पद बदलाच्या चर्चा सुरू आहेत. मात्र महाजन यांनी पालकमंत्री पदाबाबत काहीच वाद नाही. छगन भुजबळ यांनी नाशिकचे पालकमंत्री व्हावे असे त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांना वाटत असेल तर गैर नाही असे ते म्हणाले.

Web Title: It will soon be known whether the ncp are a union or a rift; Girish Mahajan's statement in nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.