चित्रपट करमणुकीचे साधन म्हणणे चुकीचे
By admin | Published: March 26, 2017 12:08 AM2017-03-26T00:08:40+5:302017-03-26T00:09:01+5:30
नाशिक : चित्रपट फक्त करमणुकीचे साधन आहे असे लहानपणापासूनच आपल्यावर बिंबविण्यात येत असल्याने प्रेक्षकांची वेगवेगळी मते बघायला मिळतात.
नाशिक : चित्रपट फक्त करमणुकीचे साधन आहे असे लहानपणापासूनच आपल्यावर बिंबविण्यात येत असल्याने प्रेक्षकांची वेगवेगळी मते बघायला मिळतात. चित्रपटाचा मुख्य उद्देश लोकशिक्षण देण्याचा आहे ही बाब प्रेक्षकांच्या मनावर खोलपर्यंत रुजायला हवी, असे मत ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांनी शनिवारी (दि. २५) नाशिक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये व्यक्त केले.
गंगापूररोड येथील रावसाहेब थोरात सभागृह येथे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, शनिवारी या फे स्टिव्हल अंतर्गत ‘कासव’ हा चित्रपट उपस्थितांना दाखविण्यात आला. यावेळी मोहन आगाशे यांनी चित्रपटांमुळे मत तयार होत असल्याने चांगल्या चित्रपटांमुळे प्रेक्षकांचे चांगले, तर वाईट चित्रपटांमुळे प्रेक्षकांचे वाईट मत तयार होते आणि यामुळेच लोकशिक्षण लोकांपर्यंत पोहचविण्यास मदत होत असल्याचे मत आगाशे यांनी व्यक्तकेले. निफ फे स्टिव्हल अंतर्गत ‘दास्ता ए रफी’ या चित्रपटासह दिवसभरात एकूण २३ लघुपट, तर संध्याकाळच्या सत्रात फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते. या फेस्टिव्हलचा रविवारी (दि. २६) समारोप होणार आहे. (प्रतिनिधी)