नाशिकमध्ये आयटीआय निदेशकांचे निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 05:16 PM2018-08-09T17:16:31+5:302018-08-09T17:16:55+5:30
राज्य सरकारी कर्मचा-यांनी तिन दिवस संप पुकारला असून गुरुवारी सातपूर येथील शासकीय आयटीआय निदेशक संघटनेच्या वतीने संस्थेच्या प्रवेशद्वारावर निदर्शने करण्यात आले. शासनाच्या वेळ काढु धोरणाच्या व बक्षी आयोगाच्या अतिशय संथ कार्यवाही मुळे सातव्या आयोगास होणारा विलंब आणि जुनी पेन्शन लागु
नाशिक : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपात शासकीय आयटीआय निदेशक संघटनेच्या वतीने गुरूवारी काळ्या फिती लावून निदर्शने करण्यात आलीत.
राज्य सरकारी कर्मचा-यांनी तिन दिवस संप पुकारला असून गुरुवारी सातपूर येथील शासकीय आयटीआय निदेशक संघटनेच्या वतीने संस्थेच्या प्रवेशद्वारावर निदर्शने करण्यात आले. शासनाच्या वेळ काढु धोरणाच्या व बक्षी आयोगाच्या अतिशय संथ कार्यवाही मुळे सातव्या आयोगास होणारा विलंब आणि जुनी पेन्शन लागु करावी यासह अन्य महत्वाच्या मागण्यांसाठी निदेशकांनी काळी फित लावुन निदर्शने केलीत. निदेशक संघटनेचे विभागीय सचिव संतोष बोराडे यांच्या नेतुत्वा खाली विभागीय सदस्य तथा नासिक शाखेचे अध्यक्ष जितेंद्र पाटील, योगेश थोरात, जितेंद्र देसाई, भगवान बिडगर, प्रशांत बडगुजर, संजय काळे, बाळासाहेब साताळे,जयराम ससाणे,दत्ता पावसे यांचेसह चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे प्रतीनिधी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.