ट्रायच्या नवीन नियमांनंतरही ग्राहकांना जूनेच पॅक रिचार्ज करण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 04:10 PM2019-02-19T16:10:56+5:302019-02-19T16:14:50+5:30

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) लागू केलेल्या नव्या नियमांमुळे १ फेब्रुवारीपासून देशभर दूरचित्रवाहिन्या पाहण्यासाठीचे समान शुल्क निश्चित करण्यात आले आहे. पण या नव्या व्यवस्थेच्या अंमलबजावणीसाठी केबल चालकांसोबतच डीटीएच कंपन्यांक डूनही अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याने  ग्राहकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. आवडीच्या वाहिन्या पाहण्यासाठी नवे नियम लागू होऊनही त्यांची अंमलबजावणी होत नसल्याने जून्याच पॅकचे रिचार्ज करण्याची वेळ ग्राहकांवर आली आहे. 

It's time for customers to recharge the old pack even after new TRAI rules | ट्रायच्या नवीन नियमांनंतरही ग्राहकांना जूनेच पॅक रिचार्ज करण्याची वेळ

ट्रायच्या नवीन नियमांनंतरही ग्राहकांना जूनेच पॅक रिचार्ज करण्याची वेळ

Next
ठळक मुद्देट्रायच्या नवीन नियमांनंतरही ग्राहकांच्या समस्या कायम केबल ऑपरेटर आणि डीटीएच कंपन्यांकडून सहकार्य मिळत नसल्याने ग्राहकांना मनस्ताप

नाशिक : भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) लागू केलेल्या नव्या नियमांमुळे १ फेब्रुवारीपासून देशभर दूरचित्रवाहिन्या पाहण्यासाठीचे समान शुल्क निश्चित करण्यात आले आहे. पण या नव्या व्यवस्थेच्या अंमलबजावणीसाठी केबल चालकांसोबतच डीटीएच कंपन्यांक डूनही अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याने  ग्राहकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. आवडीच्या वाहिन्या पाहण्यासाठी नवे नियम लागू होऊनही त्यांची अंमलबजावणी होत नसल्याने जून्याच पॅकचे रिचार्ज करण्याची वेळ ग्राहकांवर आली आहे. 
ट्रायच्या नव्या नियमानुसार देशभरात वाहिन्यांचे एकसमान दरपत्रक ठरवण्यात आले आहे. त्यामध्ये सशुल्क वाहिन्यांवरील कार्यक्रम पाहण्यासाठी पाच पैशापासून ते १९ रुपयांपर्यंत किमती ठरवण्यात आल्या आहेत. तसेच चॅनल निवडीचे स्वातंत्र्य मिळाल्यामुळे पहिल्या १०० नि:शुल्क वाहिन्या आणि त्यानंतर आपल्याला हव्या असलेल्या सशुल्क वाहिन्या अशी ग्राहकांना निवड करावी लागणार आहे. त्यामध्ये १५३ रुपये ४० पशाचा बेसिक पॅक घेऊन त्यानंतर आपल्याला हव्या त्या सशुल्क वाहिन्या असे हे गणित असले तरी केबल चालक आणि डीटीएच कं पन्यांकडून ग्राहकांना अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याचे समोर आले आहे. ट्रायने ग्राहकांना चॅनल निवडीचे स्वातंत्र दिलेले असतानाही केबल चालक आणि डीटीएच कंपन्यांकडून प्रेक्षपण करणाºया कंपन्यांनी तयार केलेल्या वेगवेगळ््या पॅकचे पर्याय उपलब्ध करून दिले आहे. परंतु, हे पॅक अ‍ॅक्टीव्ह करण्यासाठी तसेच स्वतंत्र वाहिन्यांची निवड करण्यासाठी ग्राहकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. तांत्रिक माहिती उपलब्ध नसल्याने ग्राहक अडचणीत सापडले आहे. तर डीटीएच कंपन्यांनी चॅनल निवडीसाठी उपलब्ध करून दिलेले विशेष चॅनलच्या प्रेक्षपणातच व्यत्यय येत असल्याने ग्राहकांची कोंडी होत आहे. 

ग्राहकांचे प्रश्न अनुत्तरित
एकीकडे डीटीएच कंपन्यांच्या ग्राहक सेवा प्रतिनिधी दुरध्वनीवरुन संवाद साधण्यासाठी अथवा तक्रार करण्यासाठी वारंवार प्रयत्न करूनही उपलब्ध होत नाही. आणि उपलब्ध झालेच तर ग्राहकांना आपल्या प्रश्नांचे समाधान मिळत नाही. तर दुसरीकडे केबल चालकांनी ग्राहकांना त्यांच्या आवडीच्या वाहन्या पुरविण्याच्या सूचना असतानाही केबलचालकांकडून कोणतीही कार्यवाही होताना दिसत नाही. त्यामुळे ट्रायचे नवे नियम लागू होऊन २० दिवसांचा कालावधी उलटूनही ग्राहकांना आपल्या आवडीच्या वाहिन्या पाहण्यासाठी जुनेच पॅक रिचार्ज करावे लागत आहे. अन्यथा प्रेक्षपण बंद  होत असल्याने ग्राहकांकडून संताप व्यक्त होत आहे.

Web Title: It's time for customers to recharge the old pack even after new TRAI rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.